चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : काटोल अर्जुन नगर येथील पंचशील महिला भजन मंडळाच्या गायिका आशा मेंढे यांची विदर्भशाहीर कलाकार परिषदेच्या काटोल तालुका सहसचिव प्रमुख पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली. काटोल येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या मेळावा मध्ये गायिका आशा मेंढे यांना नियुक्तीपत्र केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्ण, यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी नागपूर जिल्हा अध्यक्ष दयाळ कांबळे, अरुण वाहने, समाजसेविका संगीता भक्ते, नरेंद्र डोंगरे, अरुण सहारे, जीवन बागडे, रुपेश मेश्राम, सोनाली गोंडाणे, इत्यादी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले, मोठ्या संख्येने गावातील गायक कलावंत उपस्थित होते.


0 टिप्पण्या