Ticker

6/recent/ticker-posts

झेड.पी.निवडणुकीसाठी हौसे-नवसे व गवसे लागले तयारीला


 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-२२ पासून विविध कारणास्तव लांब झालेली झेड.पी.निवडणुक आता तोंडावर आली.आणि यासाठी हाळी हंडरगुळीतील इच्छूक हौसे,नवसे व गवसे तयारीला लागल्याचे दिसते. माञ,या हौशा,नवशा व गवशाला या गावात असलेले प्रश्न उदा:प्रा.आरोग्य केंद्रात परमानंट डाॅक्टर नेमणे,लातुर साठी जादा गाड्या सुरु करणे,बैल बाजाराला गत वैभव मिळवून देणे यासारखे प्रश्न सोडवू वाटले नाही. अन् निघाले झेड.पी.लढायला.तसेच झेड.पी.ची तयारी करणारे पोपट पंची करण्यात अण् बॅनर,पोस्टरवर झळकण्यात पटाईत आहेतअसा सुर ऐकू येतो.
कारण,वरील प्रश्न,समस्या या गरीब व सर्वसामान्य जनतेच्या जगण्याशी संबंधित आहेत.तरीही याकडे एकही मायकालाल लक्ष देताना दिसत नाही आणि निघाले झेड.पी.ची निवडणुक लढायला.
१३ रोजी गट व गणाचे आरक्षण सुटणार असल्याने दि.१३ कडे सर्व इच्छूकांसह मतदारांचे लक्ष लागलेय. गत ३ वर्ष लोकप्रतिनिधीविना झेड. पी व पं.स.चा कारभार चालल्यामुळे ग्राम विकासात अडथळे आले.आता माञ लवकरच निवडणुका होणार असल्याने जि.प.व पं.स.परिसर खादीवाल्यांनी गजबजणार आहे.हे जरी खरे असलेतरीही वरील समस्या जो कोणी सोडवायची ११३ टक्के खाञी देईल त्याच उमेदवाराच्या मागे हाळीहंडरगुळीकर मतदार उभे राहण्याची शक्यता आहे.आजवर या भागाचा जि.प.व पं.स.द्वारे किती व कुणा,कुणाचे कल्याण झाले?हे सर्व जनतेला ठाऊक आहे.म्हणुन या पुढे वरील प्रश्न,समस्यांसह अन्य मुलभुत व पायाभूत सोयी,सुविधा खाञीने सोडवेल.त्यालाच मतदार पहिली पसंती दाखविणार.यात शंका नाही.  येत्या कांही महिण्यात झेड.पी.व पं. स.निवडणुकीचे रॅकेट उडणार आहे. आणि सगळ्यांचेच लक्ष लागले आहे ते आरक्षण व मतदान तारखेकडे. पण तत्पुर्वीच कांही हौसे,नवसे,गवसे जनमत घेताना दिसतात.पण येणारी जि.प.व पं.स.निवडणुक लढविण्या करीता सज्ज झालेल्यांना हंडरगुळी येथील सरकारी दवाखान्याती अनेक समस्या सोडविण्यासह परमानंट डाॅक्टरची वरीष्ठाकडून नेमणूक करुन घ्यावी,असे का वाटले नाही? तसेच गरीब,मजुर प्रवाशांना विविध कामासाठी जिल्हा कचेरीला जावे लागते.पण यासाठी एस.टी.बसेस सुरु कराव्यात,असेही का वाटले नाही.आणि हंडरगुळीकरांची आन, बान व शान असलेला तसेच शेकडो कुटूंबियांची चूल ज्या बाजारामुळे पेटतीय.तो बैल बाजार आज बंद पडायच्या वाटेवर आहे.म्हणुन या बाजाराला गत वैभव प्राप्त करुन द्यावे,असेही आजवरच्या आणि येती निवडणुक लढवू इच्छिणा-या त्या स्वयंघोषित पुढा-यांना का वाटले नाही?असे प्रश्न मतदारराजा विचारत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या