चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा: मच्छीमारांचे सततच्या अतिवृष्टीनंतर गोदावरी नदीस आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. मासे पकडण्याचे साहित्य वाहत गेल्याने मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या परिस्थितीत त्यांच्या मदतीला शिवबाराजे फाउंडेशन धावून आले.मच्छीमारांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.
पिंपळगाव जि. बीड
आडुला जि. बीड
आबेगाव जि. बीड
पुरुषोत्तम पुरी जि. बीड
महातपुरी जि. बीड
हिवरा जि. बीड
वझूर जि. परभणी
देऊळगाव ( दुधाटी) जि. परभणी
धनगर टाकळी जि. परभणी
चुडावा जिल. परभणी ई गावांमध्ये किट वाटप करण्यात आले.
या किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, मीठ, तेल, हळद, चहापत्ती, तिखट, मराला, तूरडाळ, बेसन, एक ब्लकेट, सादी, बिस्किटे, औषधी, साबुदाणा आदी साहित्याचा समावेश आहे. शिवचाराजे फाउंडेशन महाराष्ट्रात कार्यरत असून फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. वझुर येथील भोई गल्लीतील पूरग्रस्तांना शुक्रवारी अनधान्य किटचेवाटप करण्यात आले. मराठवाड्यात पूर परिस्थिती उद्भवल्याने सर्वसामान्य, गोरगरिबांचे हाल झाले आहे. हे पाहून शिवबाराजे फाउंडेशनने पूरग्रस्तांना अन्नधान्याची किट देण्याचे ठरवले. नागपूर-भंडारा, मौदा या भागात मदतीसाठी चळवळ उभी राहिली. फाउंडेशनने आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू झाला. मोठ्या मनाच्या या भागातील नागरिकांनी जे फाउंडेशनच्या हाती दिले, त्यातील प्रत्येक श्रमाचे, कष्टाचे साहित्य गोरगरिबांपर्यंत पोहोचता केले, वझुर येथे मच्छीमारांना धान्य किट वाटपप्रसंगी शिवबाराजे फाउंडेशनचे चेतन वानखेडे, तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी सतीश नाईक, पुरवठा निरीक्षक प्रदीप मोरे, सुभाष मल्हारे वरचे माजी सरपंच लक्ष्मण लांडे ई ची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या