Ticker

6/recent/ticker-posts

“राज्यात शेतरस्त्यांचे स्पष्ट सीमांकन पूर्ण होईपर्यंत बळीराजा पाणंद रस्ते योजना थांबवा”– शरद पवळे( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

“छत्रपती शिवाजी महाराज पारदर्शक महाराजस्व अभियान राबवण्यासाठी कालावधी वाढवा!”
शरद पवळेंचे  राज्यसरकारला तातडीचे पत्त्र

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहमदनगर :-महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे यांनी “बळीराजा पाणंद रस्ते योजना” आणि शेतरस्ता नियमांच्या अंमलबजावणीपूर्वी सर्व शेतरस्त्यांचे स्पष्ट सीमांकन पूर्ण करणे बंधनकारक असल्याची मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पवळे यांनी सांगितले की, राज्य शासनाने या योजनेअंतर्गत ४०,००० हून अधिक पाणंद रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, महसूल विभागाद्वारे शेतरस्त्यांचे नोंदणीकरण व सीमांकन प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान रस्त्यांचे स्पष्ट सीमांकन न झाल्याने अनेक ठिकाणी वाद, तक्रारी व अडचणी निर्माण होत आहेत.

 *प्रमुख मागण्या:*
1. सर्व शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे सीमांकन पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी.
2. सीमांकनानंतरच अतिक्रमणाची नोंद व त्यावरील कारवाई करावी.
3. जाणूनबुजून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई, तर सीमा अस्पष्टतेमुळे झालेल्या प्रकरणात पुनर्स्थापनेची संधी द्यावी.
4. ग्रामपंचायत, महसूल व कृषी विभागाचे संयुक्त सवेक्षण पथक तयार करावे.
5. जिल्हा व तालुका समित्यांचे अहवाल ग्रामपंचायत पातळीवर सार्वजनिक करावेत.
 6. सर्व शेतरस्त्यांवर नंबरी दगड (सीमा खूण) लावण्याची अंमलबजावणी तातडीने करावी.
पवळे यांनी पुढे म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियान” अंतर्गत सुरू झालेल्या पाणंद रस्ते मोहिमेमुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला असला तरी, १५ दिवसांच्या मोहिमेचा कालावधी वाढवून ती सातत्याने राबविणे आवश्यक आहे.

त्यांनी भर दिला की, “या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ करणे आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. त्यामुळे अंमलबजावणी करताना न्याय, पारदर्शकता आणि जनहित या तत्त्वांचे पालन होणे अत्यावश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या