Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसेवा कॉलनी येथे कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-स्थानीय खात रोडवरील ग्रामसेवा कॉलनी या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा निमित्त श्री गणेश मंदिर  चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सहभोजनाने करून त्यानंतर मनोरंजक व ज्ञानवर्धक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कार्यक्रमात भाग घेणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले व तदनंतर पौष्टिक दूध बासुंदीचे वितरण करून सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 
श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री अतुल वर्मा, सचिव श्री राकेश बारई ,कोषाध्यक्ष श्री हेमराज काटेखाये यांचे नेतृत्वात उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये कॉलोनीतील सर्व कुटुंबीयांनी सहभाग घेतलेला होता यामध्ये श्री जयेश वेदी,श्री आखाडे सारवे गुरुजी ,श्रीखंडे ,चांदेवार,सौ. मेंढे, माधुरी शेंडे, चव्हाण,रिषभ ठवरे, अमोल कावळे, राहुल मासुरकर निरगुडकर, नेवारे ,चाचेरे, निमजे, करंजेकर, दीपक वैद्य ,श्री तेलमासरे , पांडे, पुरुषोत्तम समरित इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या