चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंडीपार :– आदर्श चौक मुंडीपार येथील बालमित्र दुर्गा उत्सव मंडळात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरण पसरले आहे. रोज शेकडो भाविक माताराणीच्या चरणी नतमस्तक होत आहेत.
भव्य सजावट, रोषणाई व उत्साहामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
आज माताराणीच्या दर्शनास आनंद चंद्रिकापुरे त्यांनी देवीच्या चरणी मस्तक टेकवून आशीर्वाद घेतला.
दर्शनानंतर त्यांनी भक्तिभावाने महाप्रसाद ग्रहण केले.
या प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, “माता राणी ही शक्तीची, श्रद्धेची आणि समाधानाची प्रतीक आहे. तिच्या कृपेने प्रत्येक भक्तांच्या जीवनात सुख-शांती व प्रगती नांदो हीच माझी मनापासून प्रार्थना आहे.”
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करतांना सांगितले की, “प्रत्येक वर्षी भक्तांच्या उपस्थितीमुळेच हा उत्सव अधिक मंगलमय बनतो.
संपूर्ण परिसरात *“जय माता दी”*च्या गजरांनी भक्तिभावाचे वातावरण भारावून गेले असून भक्तांचे ओसंडून वाहणारे प्रेम व श्रद्धा यामुळे नवरात्रोत्सव अधिकच तेजोमय झाला आहे.


0 टिप्पण्या