Ticker

6/recent/ticker-posts

जय माँ काली ब्रिक्स कंपनी व पोंगेझरा फार्मर प्रोड्यूसर कंपनी, घोटी – गोरेगांव येथे विजयादशमी पूजन व हवन सोहळा उत्साहात संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगाव:- तालुक्यातील घोटी येथील जय माँ काली ब्रिक्स कंपनी तसेच पोंगेझरा फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या वतीने विजयादशमी अर्थात दसरा निमित्त धार्मिक पूजन व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या पावन प्रसंगी स्वामी यशेस्वरानंदजी सरस्वती (गीताकुटी आश्रम, गिधाडी) तसेच हरिभक्त परायण शामराजजी  गौतम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पूजा-अर्चना करून हवन विधी पार पाडण्यात आला. मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यास कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धाभावाने सहभागी झाले.
हवन विधीनंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, कंपनीचे डायरेक्टर व मालक, गोरेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. सुरेंद्रजी बिसेन तसेच त्यांच्या धर्मपत्नी पंचायत समिती सदस्या सौ. शितलताई बिसेन व संपूर्ण परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि मंगलमय झाला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विजयादशमीच्या शुभप्रसंगी शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश देण्यात आला. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद करण्यात आले.
सदर सोहळ्यामुळे कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये अपार उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा विजयादशमीच्या मंगल प्रसंगी अतिशय भाविक वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या