Ticker

6/recent/ticker-posts

शिवराय चषक महाराष्ट्र स्टेट सिलंबम(लाठी काठी ) चॅम्पियनशिप 16 नोव्हेंबर ला

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : सिलांबम म्हणजे - लाठीकाठि, तलवार,दांड पट्टा, सरुल,यांचा वापर करून 06 स्पर्धा प्रकारात खेळला जाणारा खेलो इंडिया -  भारत सरकार , स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारमपारिक युद्ध कला खेळ- भारतीय संस्कृतीचे जतन व प्रसार करण्याच्या एकमात्र उद्देशाने चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन व आयुध मल्टिपर्पज अमेचुअर स्पोर्टस् अकादमी, भद्रावती द्वारा शिवराय चषक महाराष्ट्र स्टेट सिलंबम चॅम्पियनशिपचे आयोजन अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा वसाहत, भद्रावती येथे करण्यात आले आहे.
 
विदर्भ विभागातील कोचेस करिता विदर्भ विभाग प्रमुख व सिलंबम खेळाचे प्रशिक्षण सुरू करणारे जिह्यातील मार्शल आर्ट्स एक्सपर्ट मास्टर दुर्गराज रामटेके यांच्या नेतृत्वाखाली  या भव्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा ला मुख्य अतिथी म्हणून सन्मानीय  संजय शेटे सर, माजी उपाध्यक्ष - महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व अध्यक्ष महेश अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन, मुंबई यांच्या सह महाराष्ट्र राज्यात 2008 पासुन सर्वप्रथम सिलंबम क्रीडा प्रकाराचे सर्व जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू करणारे एकमात्र सिनियर इंटरनॅशनल सिलंबम एक्सपर्ट मास्टर संजय बनसोडे सर ,सिलंबम स्पोर्टस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्र हे स्पर्धाचे मुख्य रेफेरी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
सिलअंबम क्रीडा क्षेत्रातील सर्व इंटरेस्टिंग स्त्री ,पुरुष व शालेय तसेच महाविद्यालयिन स्टुडंट्स यांनी या सुवर्ण संधीचां लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्षा सौ शीतल रामटेके, सचिव बी एल करमनकर, राकेश राय, प्राविण्य पाथर्डे, करण डोंगरे,अशोक कामडे, सुरेंद्र सिंग चंदेल, संदीप पंधरे, दीक्षांत रामटेके, सिनु रामटेके,संजय माटे, लक्ष्मण घुगरे यांनी केले आहे. स्पर्धा विषयी सविस्तर माहिती करीता मोबाईल - 9067758618 यावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या