माऊली भजनी मंडळाचा दणदणीत कार्यक्रम आयोजित.....
चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील मौजे. पोटा बु. येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहिलेले आदर्श व्यक्तीमत्व समाजात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाचे काही देणे आसते आणी ते प्रत्येकाने दिले पाहिजे या सिंद्धांतावर जगलेले पोटा नगरीचे पोस्ट मास्तर स्व. शेषेराव दत्तराव माने यांची दि. 14/11/2025 रोजी नववी पुण्यतिथी मौजे. पोटा येथे आयोजित केली आहे. पोटा परिसरासह तालुक्यात परिचित असलेले व शुन्यातून विश्व निर्माण करणारे पोस्ट मास्तर या पदावर आसुन सुध्दा एक सदन शेतकरी व उत्कृष्ट वक्ते म्हणून अनेक वेळा तालुक्यातून बहुमान मिळवणारे व तसेच हे करत असतांना समाज सेवा व गोरगरिबांना मदत करत आपल्या कुटुंबावर जिवापाड प्रेम करत कुटुंबाला सक्षम कष्ठाची जान करून देत घराची धुरा सांभाळत प्रगतिचा शिखर घराला घरपण देणारे स्व. शेषेराव दत्तराव माने यांचा जिवण संघर्ष अतिशय चांगला होता. त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मौजे. पोटा येथे माऊली भजनी मंडळ नागेशवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या भजन संध्येचा आवश्य लाभ घ्यावा या कार्य क्रमात गायक विनायक सुरोशे, मारोतराव पोटे, चंद्रकांत भालेराव, गणेश इंगोले वैद्य सर यांची उपस्थिती आसणार आहे.आयोजक श्री. गजानन शेषेराव माने पाटेकर( तालुका कोंग्रेस उपाध्यक्ष हिमायतनगर)


0 टिप्पण्या