Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी जवळील गुरप्पाचा पुल बनला डेंजर...!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—उदगीर-अहमदपुर रोडवरील गुरप्पा नामक पुलाचे कठडे तुटल्याने तसेच पुलाच्या दगडी बांधकामास मोठमोठे तडे गेल्याने हा पुल धोकादायक (डेंजर) बनला असून सं.प्रशासन या पुलाची दुरुस्ती करेल का येथील सर्व अतिक्रमणधारकांकडे जसे दुर्लक्ष करत आहे.तसे याकडेही करेल का? असा प्रश्न सुज्ञ हाळी-हंडरगुळीकर जनतेसह वाहनधारकांमधून चर्चीला जातोय.
हाळीहंडरगुळीत सा.बां.खात्याची भरपूर जागा असलीतरीही आता ती जागा अनेकांनी कच्चे,पक्के अवैध अतिक्रमण करुन बळकावली आहे. आणि हे अतिक्रमण हटवून उदगीर- अहमदपुर हा रोड अतिक्रमणमुक्त करणे गरजेचे असताना संबंधित अधिकारीच तुमच्या बद्दल तक्रार केलीय अशी माहिती अतिक्रमण केलेल्याना देत असल्याचे समजते. यामुळे सा.बां.खात्याचे ते अधिकारी व येथील अतिक्रमणधारकांमध्ये मोठी डील झाली असल्याची स्लोली चर्चा हाळीतील जयप्रकाश टी च्या पाकड्यावर कांहीजण करत होते.व असे अधिकारी येथील गुरप्पा नामक पुलाची झालेली दुरावस्था दुरुस्तील का.या बद्दल शंकाच येते.
तेंव्हा सार्वजनिक बांधकाम खाते लातुरच्या वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून तत्काळ योग्य व कडक कारवाई करावी.अन्यथा पालकमंञी तथा सा.बां.मंञी शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे कांहीजण तक्रार करणार असल्याचे कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या