चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : भारतीय संविधान हमारा प्रथम राष्ट्रधर्म है! जल्लोष भारतीय संविधानाचा, संविधान बचाओ आंदोलन, राष्ट्रीय सामाजिक संघटन आणि आणि दलित पॅथर, सम्राट अशोक धम्म सेना, कर्जमुक्ती सेना, समता सैनिक दल, रि. पा. सेक्युल र, राष्ट्रीय रिपब्लिकन जन मोर्चा संयुक्त विद्यमाने संविधान दिन दिनांक-26 नोव्हेंबर 2025 रोज बुधवार ला, संविधान चौक नागपूर येथे भीम बुद्ध गीतांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी आपल्या गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी गीत- तो लाल भिमाईच्या भारी लाखो हजारा त, चंदना समान झिजला तो, साक्ष आहे संविधानात. समतेसाठी बा भीमाने, रक्ताचे केले पाणी, ढाल केली या छातीची, मनुवादी मैदानात, तो लाल भिमाईच्या भारी लाखो हजारा त, चंदन समान झिजला तो, साक्ष आहे संविधानात, समाजप्रबोधन गीत सादर केले. प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे, प्रबोधनकार सुभाष कोठाळे, प्रबोधनकार विकास राजा, प्रबोधनकार धीरज निकाळजे, प्रबोधनकार संविधान कीर्ती, प्रबोधनकार मनोज निकाळजे, गायिका सूर्यकांता पाटील, गायक मदन रामटेके, पत्रकार संजय खांडेकर, गायक रवि बाबू, सुप्रसिद्ध गायिका योजना कुकुडकर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - संस्थापक अध्यक्ष- मिलिंद खोब्रागडे, मेघराज राऊत, धीरज निकाळजे, पपीता जून घरे, रवी भाऊ शेंडे, डॉक्टर प्राध्यापक भीमराव मेश्राम, रामचंद्र सोनटक्के, राजूभाऊ इंगळे, बी, बी, कोचे, आशिष निरवादे, सामाजिक कार्यकर्ते भिमराव बाराहाते, मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते.


0 टिप्पण्या