Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर जिल्ह्याच्या शासकीय कार्यालयात कामे करणा-या खासगी व्यक्तींना हटवा



◾गौतम तोडेंची जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे मागणी !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही लेखी परवानगी नसताना काही खासगी व्यक्ती स्वतःला शासकीय कर्मचारी समजून बिनधास्तपणे महत्वाचा सरकारी रेकॉर्ड हाताळत असल्याचे निदर्शनास आले आहे.ही बाब प्रशासकीय दृष्टीकोनातून योग्य नाही.विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयासोबतच पटवारी व मंडळ अधिकारी कार्यालयात असेच खासगी व्यक्ती वरिष्ठांची परवानगी नसताना शासकीय कामे करीत असताना आढळून आले आहे.त्यांच्याकडे 
शासनाने कंत्राटीपध्दतीने नेमलेले नियुक्तीचे आदेशपत्र नसल्याचे समजते.
 असे खासगी व्यक्ती शासकीय कार्यालयात कामे करीत असल्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे  जनतेचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात विना परवानगीने कामे करणाऱ्या सर्व खासगी व्यक्तींना तातडीने हटविण्यात यावे अशी मागणी आरपीआयचे(आठवले) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी आज शुक्रवारला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
याच संदर्भात काही दिवसांपूर्वी जेष्ठ समाजसेवक पुंडलिक गोठे यांनी  आपल्या संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांकडे  हिच मागणी केली होती.
परंतु हे वृत्त लिहिपर्यत त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नव्हती.हे विशेष! 
उल्लेखनीय बाब अशी कि जिल्ह्यातील अनेक संघटनेचे नेते आता हिच मागणी उचलून धरत असल्याचे एकंदरीत दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या