नवीन कार्यकारिणी जाहीर होताच वीज, वाहतूक, अवैध धंद्यांवर मोर्चेबांधणी
स्मार्ट मीटर सक्तीने लावाल तर फोडू; महावितरणला तंबी, पोलिसांना अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भद्रावती तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर केली असून पक्ष ॲक्शन मोडवर आला आहे. सदर नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्मिती झाली आहे.
तालुका प्रमुख नरेश काळे, शहर प्रमुख बंटी हेमके, शहर संघटक बंडू चटपल्लीवार व शहर समन्वयक पदावर विनोद कोळसे या निष्ठावंत व सक्रिय शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्करभाऊ ताजणे यांच्या आदेशानुसार भद्रावती शहरातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्याचा श्रीगणेशा दि. 23 जूनपासून करण्यात आला आहे.
सतत वीज पुरवठा खंडित करून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या व स्मार्ट मीटर लावण्यास सक्ती करणाऱ्या भद्रावतीच्या महावितरण अभियंत्यांना शिवसेनेने जाब विचारला. "स्मार्ट मीटर सक्तीने लावल्यास मीटर फोडून टाकण्यात येईल व विजेचा लपंडाव बंद करा" अशी तंबी देण्यात आली.
"बाळासाहेब ठाकरे चौकातील जीवघेणी वाहतूक नियंत्रित करा" या मागणीसाठी भद्रावतीचे पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले. निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या ऑगस्टपर्यंत नागरिकांना समस्येपासून दिलासा देण्याचे कबुल केले.
शहरात अवैध धंद्यांना ऊत आला असून अनेक नागरिकांच्या तक्रारी शिवसैनिकांकडे येत आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर बंदी आणण्यासाठी शिवसेना (उ.बा.ठा.) भद्रावती तर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
तालुका प्रमुख नरेश काळे, उप शहर प्रमुख अरविंद खोबरे, शिवसैनिक राजू तांगडे, पंकज खोब्रागडे, सतीश सूर्यवंशी, चंद्रभान राऊत, मारोती सिडाम, अशोक वाणी, उषा आमटे, नंदाताई कुटेमाटे, जयाताई धुडे, वैशाली मालेकर, लता निखार, मंगला दुर्गे, कुणाली वानखेडे, माधुरी वाघाडे, यामिनी ताठे इ. शिवसैनिकांचा समावेश होता.
________________________________
उद्धवची शिवसेना भद्रावतीत 'ॲक्शन मोड'वर!*
*नवी कार्यकारिणी जाहीर होताच पहिल्याच दिवशी मोर्चेबांधणी. महावितरणला इशारा - 'स्मार्ट मीटर सक्तीने लावाल तर फोडू'. बाळासाहेब ठाकरे चौकातील वाहतूक ऑगस्टपर्यंत सुधारण्याचे पोलिसांचे आश्वासन. अवैध धंदे बंद करा, अन्यथा आंदोलन. तालुका प्रमुख नरेश काळे यांच्या नेतृत्वात आक्रमक पवित्रा.


0 टिप्पण्या