Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हंडरगुळी "१००टक्के तंबाखूमुक्त शाळा" घोषीत हंडरगुळी

विठ्ठल माने पुरस्कारप्राप्त विद्यार्थी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर  :-जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,लातूर व शिवाजी विद्यालय, हंडरगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत १०० टक्के तंबाखूमुक्त शाळा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील प्रा.घटकार रामचंद्र हे होते.यांनी तंबाखूचे दुष्परिणाम व मानसिक ताणतणाव या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. 
या कार्यक्रमासाठी डॉ.माधुरी उटीकर,जिल्हा सल्लागार,बेंबरे प्रकाश जिल्हा समन्वयक,कैलास स्वामी सामाजिक परिचारक  मानसिक आरोग्य विभाग शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर , फाल्गुनी राठोड जिल्हा समन्वयक आदित्य बिर्ला संस्था,या सर्वांनी तंबाखूचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी व मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले,या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयातील पर्यवेक्षक सुगावे बालाजी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सौ. गुडाप्पे आर.एस.तसेच आभार प्रदर्शन डॉ.सौ.नारगुडे के.पी. यांनी केले.
 उपस्थित सर्वांनी तंबाखूमुक्तची शपथ घेतली. तसेच निबंध स्पर्धेतील माने विठ्ठल बालाजी,हेंगणे श्रेयस,माने जिवन या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आले. "तंबाखूमुक्त शाळा" म्हणून विद्यालयास जिल्हा कार्यालय,लातूर यांच्या तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, युवक, युवती उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या