Ticker

6/recent/ticker-posts

निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आपले मतदानरूपी आशीर्वाद देऊन भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या : सभापती प्रा. राम शिंदे....

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098/9615179615

जामखेड :- या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आपले मतदानरूपी आशीर्वाद भाजपाच्या उमेदवारांना देऊन नगराध्यक्षासह दोन्ही नगरसेवक निवडून द्यावेत. येणाऱ्या आठ दिवसांच्या काळात तुम्ही आम्हाला वेळ द्या, सहकार्य करा व आशीर्वाद द्या. त्यानंतर पुढचे पाच वर्षे तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. निवडून दिलेल्या या उमेदवारांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहील व सरकारच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत योजना आणण्यासाठीही प्रयत्नशील राहील अशा प्रकारचे मी आपल्याला अभिवचन देतो. आपला तो आपलाच असतो, आपल्या अडचणी समजून घेणारा, आपले प्रश्न समजून घेणारा आणि आपल्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देऊन लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणारे नगरसेवक या प्रभागातून व थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची ही निवडणूक आहे. असे प्रतिपादन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

जामखेड नगर परिषदेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यानुसार काल दि. २३ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी करत असलेले युवा नेतृत्व हर्षद भाऊसाहेब काळे व लता पवार तसेच नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या अभुतपुर्व प्रचार रॅलीची सुरुवात प्रचार कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली व दुर्गामाता मंदीर येथे नारळ वाढवून समारोप करण्यात आला. यानंतर या रॅलीचे तिथेच सभेत रूपांतर झाले. यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठीचे पक्षाचे मुख्य समन्वयक प्रा. मधुकर (आबा) राळेभात, अमित चिंतामणी, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, राम पवार, आबा ढवळे, अनिकेत जाधव, बाबासाहेब राजेंद्र ओमासे, दादा गिरे, विजय कुलकर्णी आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधु भगिनी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी व उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक पाच मधील प्रत्येक नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि विकासाच्या गरजा ओळखू एक प्रामाणिक, लोकाभिमुख आणि कामगिरीवर आधारित नेतृत्व देण्याचा आमचा निर्धार आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्या लक्ष्मीताई पवार यांचा मुलगा व प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक राम पवार यांचा भाचा हर्षद भाऊसाहेब काळे व माजी नगरसेविका लता संदीप गायकवाड यांना भाजपाच्या वतीने उमेदवारी मिळाली असून या प्रभागातील मुळ रहिवासी व सामाजिक, प्रशासकीय कामांचा अनुभव असलेने हे दोन्ही उमेदवार या प्रभागातून विजयी होऊ शकतात तसेच भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांनाही येथून चांगले मताधिक्य मिळू शकते हे त्यांनी घेतलेल्या प्रचारातील आघाडीवरून दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या