"स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम"
चित्रा न्युज प्रतिनिधी
यवतमाळ:-थंडीत कोणाच्याही जगण्यात अडथळा येऊ नये या सामाजिक बांधिलकीतून स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा (ता. पुसद) यांच्या वतीने काल रात्री बेघर व गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. राजकुमार भगत यांच्या पुढाकारामुळे पुसद शहरातील विविध भागांतील बेघर, वृद्ध व गरजू बांधवांना मदत पोहोचवण्यात आली. अचानक वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर या सेवा कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. अध्यक्ष राजकुमार भगत यांनी सांगितले की, “गरजू नागरिकांना उबदार आधार देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आगामी काळात संस्था अशा सामाजिक उपक्रमांना अधिक गती देणार आहे.” या उपक्रमात विशाल डाके ,अश्विन कांबळे, व संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


0 टिप्पण्या