चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-हंडरगुळी येथे १० डिसेंबर रोजी टिपू सुल्तान जयंती साजरी करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला आहे. या संदर्भात मुस्लीम समाजबांधवांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली.
यामध्ये जयंती अध्यक्ष म्हणुन मन्नान चौधरी,उपाध्यक्ष अय्यूब अतार तर सचीव इस्माईल शेख व कॅशियर सद्दाम चौधरी,अखील शेख यांची एकमताने निवड करण्यात आली.
दि.१० डिसेंबर रोजी टिपू सुल्तान जयंती साजरी होणार असून जयंती दिवशी(१०डिसेंबर)सायंकाळी ६ वा. सर्वधर्मिय सामाजिक एकता व सद्भावना या विषयावर छञपती शिवाजी महाराज चौक हंडरगुळी येथे व्याख्यानमाला (इस्लाए माअशरा) आयोजित केली आहे. अशी माहिती सद्दाम चौधरी यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या