Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर-अहमदपुर रोडवर रिफ्लेक्टर नसलेली वाहने जोमात तर आरटीओ विभाग कोमात..!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-वाहन कोणतेही असो,त्याच्या पुढे व मागे नंबर व रिफ्लेक्टर असायलाच पाहिजे. असा मोटार वाहन कायदा सांगतो.
माञ,उदगीर-अहमदपुर या रोडवर हा कायदा कांही वाहने पायदळी तुडवत जोमात धावताना व आरटीओ खाते कोमात..! गेल्याची चर्चा दबक्या आवाजात कानावर पडतेय.तेंव्हा आरटीओ एखादा भयंकर मोठा अपघात झाल्यावरच कारवाई करतील का?
याची थोडक्यात माहिती अशी की, मोटार वाहन कायद्यानुसार हरएक वाहनांना नंबर व रिफ्लेक्टर असते. विशेष म्हणजे ऊस,लाकूड,वाळू वाहतूक करणा-या वाहनांना नंबर व रिफ्लेक्टर लावणे कायद्याने बंधन कारक आहे.
माञ,या रोडवर वाळू,लाकडं,दगडं वाहतूक करणारी हायवा,ट्रॅक्टर,ट्रक ही वाहने नंबर व रिफ्लेक्टर नसलेले दिसतात.तरीही अशाप्रकारच्या ५०१ गाड्यांवर गत वर्षभरात दंडात्मक कारवाया केल्याची बढाई मारणा-या आरटीओ (परिवहन) विभागाने या मार्गावर अशा किती वाहनांना दंड केला?असा सवाल नंबर,रिफ्लेक्टर  नसूनही सुसाट व बिनधास्तपणे धावणा-या वाहनांकडे बघून जनता विचारत आहे. लोडिंग,ओव्हरलोडिंगसह प्रवाशी वाहतूकीच्या गाड्यांना मोटार वाहन कायद्यानुसार नंबर,रिफ्लेक्टर असलेच पाहिजे.सर्वसाधारपणे मागच्या बाजुला लाल रंगाचे रिफ्लेक्टर हवेच.यामुळे अपघाताचा धोका टळू शकतो. पण,उदगीरचे एम.एच.५५ हे परिवहन खातेच या कायद्याचा दांड पट्टा या रोडवर चालवित नाहीत. म्हणुनच या रोडवर विशेष करुन हाळी-हंडरगुळीतून नंबर व रिफ्लेक्टर नसलेली ट्रॅक्टर,हायवा,ट्रक अशी शेकडो वाहने सुसाटपणे धावताना दिसतात.वाहनांना नंबर व रिफ्लेक्टर बसविणे कायद्याने बंधनकारक आहे व नियम मोडणा-या वाहनांवर एक ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद कायद्यात आहे.तरीही रिफ्लेक्टर व नंबर नसलेले असंख्य वाहने हाळी मार्गे धावतात.तरीही अशा वाहनांवर आर.टी.ओ.ने कारवाई केल्याचे कधीच दिसून आले नाही.व तशी चर्चा पण नाही.तसेच कारवाई होत नसल्यामुळे असे वाहनधारक आर.टी. ओ.शी स्पेशल भेटत तर नसतील.असा सवाल माञ चर्चीला जातोय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या