सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड - मागील नगरपरिषद निवडणुकीत आमच्या कडून तिकीट वाटपात काही चूका झाल्या होत्या या वेळी चूका होणार नाहीत. मी स्वतः मुलाखती घेतल्या आहेत. चोवीस जागेसाठी ११४ उमेदवार रिंगणात आहेत. जिंकण्याच्या मिरीटनुसार तिकीट दिले जाणार आहे. राहिलेल्या इच्छुकांना पक्ष इतर ठिकाणी संधी देणार आहे. कोणत्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही त्या - त्या जागेवर नियोजन बद्द कार्यक्रम करू .स्वच्छ सुंदर जामखेडचा
अजेंडा घेऊन निवडणूक सामोरे जाणार व ते वचन पूर्ण करणार असे विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामखेड नगरपरिषद संदर्भात गेल्या पाच दिवसांपासून सभापती प्रा राम शिंदे तळ ठोकून जामखेड मध्ये आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतः घेतल्या आहेत. जामखेड च्या विकासासाठी रस्ते, पाणी, भूमीगत गटारे वाडी वस्ती वरील रस्ते सर्व काही जाहीरनाम्यानुसार करणार आहोत. सत्ता भाजपाचीच येणार आहे.
चौवीस जागेसाठी ११४ उमेदवारांनी मुलाखती दिल्ल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. निवडणूक येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. कोणाचीही शिफारस कामी येणार नाही.
नगरपरिषेत आपली सत्ता असताना आपण अनेक चांगले कामे केली. तसेच जामखेड चा डीपी प्लॅन अन्यायकारक होता. त्याला स्थगिती मिळवली शहरात रिंग रोड, स्वच्छ चोवीस तास पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छ सुंदर शहर अजेंडा घेऊन निवडणूकीसाठी सामोरे जाणार व ते पुर्ण करणार असे सांगितले.
जामखेड येथे भाजपा कार्यालयात सभापती प्रा राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी प्रा.
मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी ,तालुका मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे, भाजपाचे निवडणूक प्रभारी, शेखर खरमारे, अजय काशिद, शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,
आजीनाथ हजारे, , डॉ भगवानराव मुरूमकर, पोपट राळेभात, सोमनाथ राळेभात, केशव वनवे, डॉ. विठ्ठल राळेभात, सोमनाथ राळेभात, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, तुषार बोथरा, सुहास वारे, बाजीराव गोपाळघरे, गुड्डू विटकर, अर्जुन म्हेत्रे यांच्या सह अनेक भाजपाचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवार हजर होते.
अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना टप्प्या - टप्याने नुकसान भरपाई मिळणार त्यामुळे नगरपरिषद , जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसून नगरपरिषदेवर बहुमताने सत्ता येणार असल्याचे सभापती राम शिंदे व्यक्त केले .


0 टिप्पण्या