Ticker

6/recent/ticker-posts

श्री. संत नगाजी महाराज देवस्थान पारडी येथे आरोग्य शिबीर संपन्न.


 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती /चंद्रपुर : जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश व नाभिक युवा क्रांती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पारडी येथ नागदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 26 नोव्हेंबर 2025, बुधवार रोजी श्री संत नगाजी महाराज मंदिर परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. प्रमोदजी पानबुडे, मंदिर ट्रस्टचे दिवाणजी काका, तसेच उपस्थित कीर्तनकारांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात आलेल्या महाराज मंडळींना, डॉक्टरांना व वैद्यकीय टीमला संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्याध्यक्ष गणेश वनकर व नाभिक क्रांती महाराष्ट्र राज्याध्यक्ष अर्पित नक्षीने यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शिबिरासाठी नाभिक संगठनातील नरेश मांडवकर, अखंड नाभिक संस्था नानाजी जुनारकर, कृष्णाजी चौधरी, नगाजी दरवडकर, सूर्यकांत अत्तकर, तसेच दवाखान्यातील संपूर्ण कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य गजानन टमके व त्यांच्या टीमकडून मिळाले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गजानन टमके व त्यांच्या सहकाऱ्यांना श्री संत नगाजी महाराजांचा ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.
शिबिरात विविध आरोग्य तपासण्या, सल्ला व उपचार सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या