Ticker

6/recent/ticker-posts

✦ माझे संविधान – माझी ओळख ✦

✦ माझे संविधान – माझी ओळख ✦ 

अक्षरांच्या मातीमध्ये पेरला गेला विश्वास,
जनतेच्या धडधडीतून उमटला न्यायाचा सुरेल श्वास.
हा फक्त कायद्यांचा ग्रंथ नाही,
हा आहे स्वप्नांचा पहाटवेळ,
जिथे प्रत्येक नागरिकाचा उजाडतो नवा उमेदीचा मेळ.

स्वातंत्र्याची चाहूल देतो, समतेची कवडसे पेरतो,
हक्कांच्या छायेखाली उभं राहून कर्तव्याचं शिक्षण देतो.
वादळं आली तरी न ढळणारा,
मतभेदांतही न गुंतणारा—
हा आहे राष्ट्राचा नकाशा,
भविष्यातील पावलांना दिशा दाखवणारा.

संविधान म्हणजे फक्त नियम नव्हे,
तो आहे लोकांचा आवाज,
न्यायाच्या मार्गावर चालण्यासाठी
दाखवणारा अढळ प्रकाश.

आपण त्याला जपू
प्रतिज्ञेसारखं, श्वासासारखं,
कारण संविधान हेच आहे
भारतातल्या प्रत्येक मनाचं—
सामर्थ्य, सत्य आणि स्वाभिमानाचं.

रूपेश पांडुरंग कुतरमारे
मु. ताडाळा, बोपापुर, ता वरोरा, जिल्हा चंद्रपुर.
मो नं 9309903758

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या