चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-1 डिसेंबर जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. प्रमोद पोतदार याचें अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
एड्स या गंभीर आजाराविषयी तसेच त्याच्या प्रतिबंधक उपायांबद्दल जनजागृती करणे, एचआयव्ही बाधित लोकांबद्दल सहानुभूती बाळगणे आणि या आजाराविषयी चुकीची माहिती न पसरवता एचआयव्ही बाधित व्यक्तींशी संवेदनशीलतेने वागणे या सर्व उद्देशांसाठी आजचा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून पाळला जातो. एका सुसंस्कृत समाजाचे नागरिक म्हणून या सर्व उद्देशांप्रती कटिबद्ध राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे संबोधन अध्यक्षांनी केले.
1 डिसेंबर 2025 जागतिक एड्स दिन घोषवाक्य
"अळथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही /एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू!"
द्वारे समुपदेशक श्रीकांत गोहाड यांनी प्रास्ताविक करून एचआयव्ही विषाणूचा प्रसार कसा रोखल्या जाईल याबद्दल प्रास्ताविकामध्ये माहिती दिली तसेच एचआयव्ही सह जीवन जगणारे व्यक्ती ऐआरटी औषधाद्वारे आपले संपूर्ण आयुष्य जगू शकतात अशी माहिती दिली .
कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन मध्ये कुमारी सुवर्णा श्रीराव यांनी भेदभाव,कलंक कमी करणे तसेच एच आय व्ही एड्स ऍक्ट 2017 याबाबत माहिती दिली आणि आभार प्रदर्शन केले
या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिंगणे सर. डॉक्टर गणोरकर सर, अधिपरिचारिका श्रीमती सुमन जावरकर, श्रीमती विद्या पाटील, तसेच रुग्णालयीन कर्मचारी श्री विनय शेलुरे, श्री आशिष पाटील ,आनंद बुले ,सुजित वानखडे, अमोल झाडे, प्रशांत बेहरे , स्वाती बुरंगे, वृषाली भगत, प्रकाश पांडे, पुष्पा पंधरे ,कल्पना पंधरे, भारती राऊत, अर्चना पवार, वसीम भाऊ, प्रशांत पावडे, भीमरावजी चव्हाण, मनीष अग्रवाल, आशिष नेरकर ,गौरव हरले, नागोराव खडसे , राहुल बोरकुटे,तेजस्विनी डाफे, नीलिमा भोकरे, ऋतुजा वैद्य, कांचन राऊत,निकिता खडसे, काशी बारंगे तसेच रुग्ण व इतर रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या