चित्रा न्युज प्रतिनिधी
हिंगोली:- जिल्ह्याच्या वसमत शहरात आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील विविध धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील तरुण युवक, सामाजीक सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी बांधवांच्या सहभागातून दुपारच्या सत्रात भव्य असी भगवान बिरसा मुंडा यांची डिजे व ढोल ताश्यांच्या गजरात शहरातील मुख्य रस्तांनी मिरवणूक काढण्यात आली.तर यावेळी व विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आदिवासी नृत्य व तसेच उत्कृष्ट देखावे सादर करुन शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत. दिवसभराच्या विविध उपक्रमांनी परिसर दुमदुमुन गेला.
यावेळी वर्धमान मंगल कार्यालयात प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार राजु भैया नवघरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विठुलराव पोटे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री किशनराव गारोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणाजीराव बेले, तसेच माजी हिंगोली जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉ सतीष पाचपुते, सौ. सुर्यकांताताई मिराशे, हाफिज अब्दुल रहेमान, कन्हैया बाहेती, वसंतराव चेपुरवार, माननीय धनंजय गोरे, रमेशराव दळवी, लक्ष्मणराव कुरुडे, अलीम भैय्या, सरपंच सतीश पोले, तसेच यावेळी विचार मंचावर सौ.प्रभावतीताई खंदारे, प्रवीण शेळके, व माननीय प्रकाश इंगळे यांच्या सह आलेल्या सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यांच्या क्रांतिकारी जीवनकार्य, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण करून मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपरिक नृत्य, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्थानिक नागरिक व युवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. सामाजिक ऐक्य, हक्कांसाठी लढा आणि अत्याचाराविरुद्ध उठाव, व तसेच आजच्या तरुण युवकांनी व्यसनापासून अलिप्त राहून स्वाभीमानाने जिवन जगल पाहीजे. या बिरसा मुंडा यांच्या विचारांची आजच्या पिढीपर्यंत पोहोच करण्याचा संदेश या वेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून, शहरात सर्वत्र प्रेरणादायी वातावरण यावेळी पाहायला मिळाले.


0 टिप्पण्या