चित्रा न्युज प्रतिनिधी
हैदराबाद :-हैदराबादमध्ये 9 वर्षाच्या शाळेतील मूलांने, आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. हैदराबादमध्ये 9 वर्षाच्या मुलाने शाळेतच जीवन संपवले आहे. आयकार्डनेच गळफास घेतला आहे. प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारी ही घटना हैदराबादमध्ये घडली आहे. अचानक बोलता बोलता एखादा मूलगा शांत किंवा चिडचिड करत असेल तर, याकडे दुर्लक्ष करु नका. मस्करीत केली जाणारी बुलिंग एखाद्याचा जीव घेऊ शकते.
हैदराबादमधील चंदानगरमध्ये गळफास लावून विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. शाळेचा गणवेश मृत्यूचे कारण ठरला आहे. पालकांनी अजिबात याकडे दुर्लक्ष करु नका. चंदा नगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे चौथी इयत्तेत शिकणाऱया 9 वर्षीय प्रशांतने त्याच्या वर्गमित्रांकडून होणाऱया छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशातील शाळांमध्ये वाढत्या छळ आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तपासात असे दिसून आले की, प्रशांत शाळेत त्याच्या वर्गमित्रांच्या वागण्याने खूप व्यथित झाला होता. त्याचे वर्गमित्र अनेकदा शाळेचा गणवेश नीट न घातल्याबद्दल त्याला चिडवत असत. या त्रासाला कंटाळून प्रशांतने आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे. घरी परतल्यानंतर त्याने ओळखपत्राचा वापर करून फासावर लटकला आहे.
संध्याकाळी प्रशांत शाळेतून परतला तेव्हा त्याने कपडे बदलले नाहीत किंवा बॅग काढली नाही. तो थेट वॉशरूममध्ये गेला आणि शाळेच्या ओळखपत्राच्या दोरीने गळफास घेतला नाही. बराच वेळ बाहेर न आल्यानंतर दार उघडले असता निष्पाप प्रशांत लटकलेल्या अवस्थेत आढळला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
त्यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे, आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, मुलाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात
आला.
शाळांमध्ये बुलिंगविरुद्ध कडक कायदेशीर तरतुदी अस्तित्वात असल्याचे पोलिस आणि शिक्षण अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱयांच्या मते, “बुलिंगमध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित केले जाऊ शकते किंवा सक्तीने दुसरया संस्थेत स्थानांतरित केले जाऊ शकते. शिवाय, दोषी आढळलेल्यांना वयानुसार अनिवार्य मानसिक समुपदेशन आणि कायदेशीर शिक्षेची तरतूद देखील आहे.“
छळ करणाऱयांची ओळख पटविण्यासाठी चंदा नगर पोलिस आता शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत आहेत. 2022 मध्येही असाच एक प्रकार घडला. हैदराबादमध्ये ही घटना पहिलीच अशी दुर्घटना नाही. 2022 मध्ये गृहपाठाच्या दबावामुळे एका मुलाने आत्महत्या केली. बाल हक्क कार्यकर्त्यांनी आता शाळांमध्ये मजबूत मानसिक आरोग्य समर्थन प्रणालीची मागणी तीव्र केली आहे.
एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रशांत एका खाजगी शाळेत शिकत होता. त्याचे वडील शंकर म्हणाले की तो खूप सक्रिय मुलगा होता, त्याने कधी कोणाशीही वाद केला नाही. घरी परतल्यावर तो न बोलता बाथरूममध्ये गेला. त्याने मानसिक तणावतून हे पाऊल उचलले आहे. या कुटुंबाला दुःख झाले आहे. सकाळी शाळेत जाणारा एक आनंदी मुलगा संध्याकाळी कायमचा निघून गेला आहे. अशा घटनेने हैदराबादमध्ये लहान मूलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


0 टिप्पण्या