Ticker

6/recent/ticker-posts

सातारामधील बरड शिवारात जादूटोण्यासाठी, बिबट्याला मारल्याचा प्रकार उघड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सातारा:-सातारामधील बरड शिवारात जादूटोण्यासाठी, बिबट्याला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी रविंद्र घोरपडे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतात हा मृतदेह आढळून आला.
 वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. विशेष म्हणजे या बिबट्याचे चारही पंजे कापून वेगळे करण्यात आले असून, एकूण 18 नखे गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बिबट्याचे दात आणि मिशा सुस्थितीत असल्याने या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.  
 बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र चारही पाय कापण्यात आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याची नखे तस्करीसाठी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने वापरण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनविभागाकडून अधिक तपास सुरू आहे.
  घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेमुळे मत्त्यापूर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांवरील वाढते हल्ले आणि बेकायदेशीर शिकारीच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या