चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे:- पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या, कीर्तनावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात विनापरवाना रोडवर चाललेले इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुणे पोलिसांकडून बंद करण्यात आले आहे. पोलीस आल्यानंतर महाराज, कार्यक्रम बंद करा, असे सांगण्यात आले. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद पोलिसांकडून अचानक बंद करण्यात आल. पोलीस आल्यानंतर पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामुळे रोडवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावर विनापरवाना कोणताही कार्यक्रम करता येणार नाही, असे पुणे पोलीसांनी सांगितले आहे.
राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे पुण्यात सुरू असलेले कीर्तन, पुणे पोलिसांकडून काही वेळेसाठी बंद करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील हांडेवाडी उपनगर परिसरात सुरू असलेले कीर्तन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आले. रहदारीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या कीर्तनामुळे वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी ही भूमिका घेतली. नंतर जमलेले लोक एका बाजूला बसले आणि एका बाजूने वाहतूक सुरू झाली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुन्हा सुरू झाले. ही घटना रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील हांडेवाडी परिसरात निवृत्ती महाराजांचे कीर्तन सुरू होते. हे कीर्तन ऐकण्यासाठी लोक रस्त्यावर बसले होते. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आले. या कार्यक्रमामुळे हडपसरपर्यंत लांबलचक गाड्यांची रांग लागली. त्यामुळे एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आला आणि त्याने महाराजांना रोडवर विना परवाना सुरू असलेले कीर्तन बंद करण्यास सांगितले. रस्त्यावर सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे हडपसरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं पोलीसांनी सांगितले आहे. त्याने महाराजांना कीर्तन बंद करण्यास सांगितले. विना परवाना रस्त्यावर, कीर्तनाला परवानगी नसल्याचेही पोलीस अधिकारी म्हणाले आहेत. त्यामूळे पुण्यात अचानक इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुणे पोलिसांकडून थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


0 टिप्पण्या