Ticker

6/recent/ticker-posts

नियमित ध्यान धारणा ने शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारते -डॉ. संजय मानकर



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-२१ डिसेंबर 2025 ला जागतिक ध्यान दिनानिमित्त योगभारती बहुउद्देशीय संस्था भंडारा व पतंजली योग समिती भंडारा यांच्या वतीने शिवार्पण टॉवर भंडारा येथे "जागतिक ध्यान दिवस उत्साहात" साजरा करण्यात आला. योगगुरु श्री श्याम कुकडे यांचे मार्गदर्शनात नियमित योगवर्ग घेण्यात आले. प्रमुख अतिथी व वक्ता डॉ. संजय कृष्णराव मानकर यांनी जागतिक ध्यान दिनाबद्दल सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती व आदर्श निरोगी जीवनशैली बद्दल आरोग्य प्रबोधन व समुपदेशन केले. समाजात मानसिक आरोग्य, मन:शांती, नैतिक मूल्य आणि जागतिक एक्य वाढविण्याच्या त्यामागे उद्देश आहे. "ध्यान ही केवळ व्यक्तीश:साधना नसून त्यामध्ये  सामूहिक चेतनेत परिवर्तन घडवण्याची शक्ती आहे, सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थनाचे अतोनात महत्त्व आहे. 'नियमित ध्यान_धारणा ने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते" आणि विपश्यना_ साधना या मनाला शांतता बुद्धीज्म व सुकोमलता प्रदान करतात. ध्यान संवेदनशील आणि विवेक यात समतोल आणते आणि अंतर्गत शक्ति सुधारते. ध्यान आणि प्राणायाम खूप महत्त्वाचे आहेत. "नियमित योगाभ्यासा सोबत ध्यानधारणा प्रार्थना, निरोगी, आदर्श जीवनशैलीचा सर्वांनी अंगीकार करावा" असे डॉक्टर संजय मानकर यांनी प्रतिपादन केले . या प्रसंगी शाम कुकडे,महादेव बांगडकर,चिंधूजी बुधे,सदानंद इलमे,अतुल वर्मा, वामन गोंधुळे,सईद शेख,विठ्ठलराव सेलोकर,पुरुषोत्तम वैद्य ई मान्य वर सह योग साधक व साधिका उपस्थित होते.
   कार्यक्रम पश्चात श्री आत्माराम बेदरकर यांचा ६३ वा वाढदिवस ही साजरा करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या