Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, कोणी एकाने सुरुवात केली, तर दुसराही गप्प बसत नाही. जरा धीर धरा

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे :- जाहीर झालेल्या नगरपालिका,नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामाला, कार्यक्षम नेतृत्वाला पसंती दिली आहे.राज्याचा सर्वांगीण विकास, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी आम्ही घेतलेले निर्णय मतदारांना भावले आहेत.हा विजय महायुतीचा सामूहिक विजय आहे. आम्ही जिथे एकत्र लढलो तिथे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि जिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तिथेही लोकशाहीचा आदर करण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही आम्ही याच ताकदीने आणि समन्वयाने पुढे जाऊ.राज्यातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.महापालिका निवडणुकीत शरद पवा रांच्या पक्षासोबत युती करणार?
यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत युती करणार का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. आज रात्री विचार करुन सांगतो, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं. तसेच शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष राष्ट्रवादीसोबत युती करण्यास विरोध करत आहेत. त्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "ठिक आहे. प्रत्येकाला स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार असतो. तसं ते मांडत आहेत", असं उत्तर अजित पवारांनी दिलं.महापालिकांबाबत मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेलं आहे. मी पुणे जिल्ह्यात गेल्या 35 वर्षांपासून काम करतो आहे. मला या जिल्ह्याने नेहमी साथ दिलेली आहे. नगर परिषद निवडणुकीतही चांगली साथ दिली आहे. अनेक ठिकाणी चुरशीची लढत होती. पण तिथेही साथ दिली. मधल्या काळात आमचं ठरलं होतं की, आम्ही मित्रपक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाहीत. पण ते घेतले गेले. त्याबद्दल मुंबईत गेल्यावर आम्ही चर्चा करु. 9 वर्षांनी निवडणूक होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील माणसं घेतली तर त्या पक्षाचे इच्छुक उमेदवार नाराज होतील", असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं.एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे, मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. शेवटी आम्ही सगळे जण या सगळ्यांच्या मदतीने 288 मतदारसंघात लढलो. त्यापैकी 238 मतदारसंघांमध्ये आमच्या जिवाभावाची कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं. पण कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे आम्ही काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो. आतादेखील महापालिका निवडणूक आहेत. प्रत्येकाला वाटतं की, आपला महापौर व्हावा. तसे प्रयत्न सगळ्यांचे सुरु आहेत. तिथल्या परिस्थितीनुसार तिथले जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, कोणी एकाने सुरुवात केली, तर दुसराही गप्प बसत नाही. जरा धीर धरा
पवार म्हणाले, 'महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाही, असे ठरले होते. मात्र, काही ठिकाणी ते घेण्यात आले. याबाबत मी संबंधित पक्षप्रमुखांशी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्याने संबंधित पक्षातील मूळ उमेदवार नाराज होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळण्यासाठी हे उमेदवार प्रतिक्षेत होते. आता तेही संधी शोधतील. काही सहकारी मला भेटले आहेत. प्रभागातील चारही उमेदवार निवडून यावे, हा माझा प्रयत्न आहे. पक्ष प्रवेश देण्यास कोणी सुरुवात कोणी केली तर दुसराही गप्प बसत नाही.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या