चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :- १००० C-60 कमांडो, २१ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार, तसेच १०५० मनुष्यबळ, ०४ जेसीबी, ०७ ट्रेलर, ०२ पोकलेन व २५ ट्रक यांच्या मदतीने काम पूर्ण करण्यात आले.
नव्या पोलीस स्टेशनमध्ये वायफाय, १२ पोर्ट कॅबिन, जनरेटर शेड, आर.ओ. प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, मॅक वॉल, बी.पी. मोर्चा व ०८ सँड मोर्चा अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
उद्घाटनप्रसंगी आयोजित जनजागृती मेळाव्यात स्थानिक नागरिकांना जीवनोपयोगी साहित्य व मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदीप पाटील, उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट 191 बटालियन सीआरपीएफ श्री. सत्यप्रकाश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, जवान व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिदुर्गम भागात सुरक्षितता आणि विकासाचा मुख्य प्रवाह पोहोचवणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


0 टिप्पण्या