Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पाटीवर सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु झाल्याने शेतक-यांची झाली सोय

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—शासनमान्य सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करावे,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती.याची दखल घेत उदगीर तालुक्यातील वाढवणा खु. येथील अॅग्रोविंग्स अॅग्रो कंपनीने वाढवणा पाटी किनी यल्लादेवी येथे दि.२४ डिसेंबर रोजी सोयाबीन केंद्र सुरु केले असल्याने परिसरातील शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा.अशी विनंती तथा आवाहन अॅग्रोविंग्स कंपनी यांनी केले आहे. राज्याच्या अनेक भागात असे केंद्र कधीच सुरु झाली.माञ या भागात केंद्र नव्हते.म्हणुन वाढवणा परिसरातील बहूतांश मध्यमवर्गीय शेतक-यांनी आडतीला पडेल भावात सोयाबीन विकले.तर असंख्य शेतकरी शासन मान्य हमीभाव केंद्र सुरु व्हायची वाट बघत होते.आणि महाराष्ट्र राज्य शेती पणन मंडळ व नाफेडची आधारभुत खरेदी योजना (PSS)दि.२४ला अॅग्रोविंग्स अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लि.वाढवणा खुर्द यांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी किनी यल्लादेवी रोडवर सुरु केल्यामुळे उदगीर,जळकोट,चाकुर तालुका हद्दीतील हंडरगुळी,रुद्रवाडी, मोर्तळवाडी,सुकणी,जगळपुर,डोंग्रजशेळगाव,डाऊळ,हिप्परगा,सुकणी सह शेकडो गावातील शेतकरी-यांची सोय झाल्याने शेतक-यांमधून खुषी व समाधान व्यक्त होत आहे.
शासनमान्य हमी भाव केंद्र आजवर नव्हते.म्हणुन अनेकांनी आडतीत पडेल भावात सोयाबीन विकलेत. माञ उशीरा का होईना वाढवणला केंद्र सुरु झाल्याने शेतक-यांची सोय झाली आहे.असे मत मुन्ना माने, शेतकरी,हंडरगुळी यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या