चित्रा न्युज प्रतिनिधी
नवी दिल्ली :- देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर, टोल चोरी थांबणार आहे ,तर महामार्गावर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होणार आहे, असे केंद्रसरकारने म्हटले आहे. टोल नाक्यावरुन वाहनं 80 किमी वेगाने गेली तरी टोल कट होणार आहे. सरकारचा नवा प्लॅन लागू होणार आहे. सरकारचे 6000 कोटी वाचणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना संसदेच्या सभागृहात बोलताना या नव्या प्रणालीची माहिती दिली असून नेमकं टोल कलेक्शन कसे होणार याबद्दलची माहिती दिली आहे. दिला आहे.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर मल्टी-लेन फ्री फ्लो टोल प्रणाली आणि एआय आधारित महामार्ग व्यवस्थापन 2026 अखेर पूर्णपणे अंमलात येणार आहे. यामुळे टोल नाक्यांवरील प्रतीक्षा पूर्णतः संपेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. देशातील टोल चोरी थांबेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होईल, असे ते म्हणाले आहेत.
देशातील नव्या टोल नियमांत नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. परिणामी वाहनांना टोलवर थांबावे लागणार नाही. पूर्वी टोल भरण्यास 3 ते 10 मिनिटे लागत होते. आता फास्टॅगमुळे हा वेळ 60 सेकंदांपर्यंत आला आहे. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलने वाहनांना कमाल 80 किमी प्रतितास वेगाने टोल पार करता येईल आणि कुणालाही थांबवले जाणार नाही.
नवीन प्रणाली तांत्रिक दृष्ट्या ही फास्टटॅग, वाहन नोंदणी क्रमांक व्हिआरएन, जीपीएस, ऑटोमेटिक नंबर प्लेट रेकग्निशन एएनपीआर, आणि एआय-आधारित तंत्रज्ञानावर आधारित आहे. वाहन चालवत असतानाच टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे. यासाठी कोणतेही बैरिकेट किंवा टोल बूथ उभारण्याची गरज नाही. ठराविक ठिकाणावरुन कार अगदी 80 किमीच्या वेगाने गेली तरी टोल आपोआप कापला जाईल.
देशात सर्व ठिकाणी टोलनाक्यावर कॅमेरे आणि सेन्सर वाहनाची ओळख पटवून फास्टटॅगच्या खात्यातून टोल रक्कम कापून घेतली जाणार आहे. देशातील सर्व महामार्गावर गॅन्ट्री उभारल्या जाणार असून, ज्यावर उच्च दर्जाचे कॅमेरे आणि सेन्सर बसवलेले असतील. फास्टटॅग देयके 7 दिवसांत कापली जातील; वेळेत न भरल्यास ई-नोटीस मिळेल आणि दंडही भरावा लागेल.
देशातील मोठया महामार्गावर कोणत्याही टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि इंधनाची बचत होऊन साधारण 1500 कोटी रुपयांची देशातील सरकारची बचत होईल. म्हणजेच वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच कमी इंधन खर्चामुळे प्रदूषण कमी होणार असल्याने ही पर्यावरणपूरक यंत्रणा ठरणार आहे. सध्याच्या फास्टटॅग प्रणालीला या नव्या प्रणालीत इंटीग्रेट केलं जाईल. एआयच्या मदतीने वाहनांची अचूक ट्रॅकिंग आणि टोल वसुली केली जाईल. टोल चोरी थांबेल आणि सरकारी महसूल 6 हजार कोटी रुपयांनी वाढेल.
देशात सध्या नवीन प्रणालीसाठी चाचण्या सुरू आहेत. देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली गुजरातमधील चोर्यासी टोल प्लाझा राष्ट्रीय महामार्ग 48 वर आणि हरियाणातील घरौंडा टोल प्लाझा राष्ट्रीय महामार्ग 44 वर येथे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील 5 टोल प्लाझावरही चाचणी सुरू आहे. आता देशात सर्व महामार्गावर नवीन नियमाची टोल प्रक्रिया सुरू होणार आहे, असे केंद्रसरकारने म्हटले आहे.


0 टिप्पण्या