चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान दि.9 डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला होता.
सदरहु मोर्चात पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय सदस्यगण या शिवाय सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल { SRPF } गृहरक्षक दल { होमगार्ड } सहभागी झाले होते.पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता.
गृहराज्य मंत्री पंकज भोयर व अप्पर मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या कडे निवेदन देऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदरहु मोर्चात महाराष्ट्र राज्याचे पोलिस बॉईज असोसिएशनचे 200 हून अधिक पदाधिकारी व सदस्यगण मोर्चात सहभागी झाले होते..


0 टिप्पण्या