Ticker

6/recent/ticker-posts

मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू -जनार्धन गेडाम यांचा शासन व प्रशासनाला इशारा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : शहरातील तुकूम परिसरात  दिनांक 2 जून 2025 ला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या दोन आदिवासी मुलींचा अपघात झाला त्या अपघातामध्ये सानिका कुमरे आणि काजल आत्राम या दोन्ही आदिवासी मुली गंभीर जखमी झाल्या ! त्यात सानिका कुमरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर  काजल अत्राम यांच्यावर क्राॅइस हॉस्पिटल तुकूम येथे उपचार करण्यात आला. परंतु उपचारानंतर सुद्धा काजल आत्राम या पूर्णपणे ब-या झाल्या नाहीत‌ त्या दोन्ही मुलींचे पुनर्वसन व्हावे यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत त्यांना कुठली मदत करण्यात आली नाही. 
त्याचप्रमाणे मुल तालुक्यातील नालेश्वर मोकासा या गावांमध्ये ग्रामपंचायतचे सचिव आणि पंचायत समिती मुलचे गटविकास अधिकारी यांनी  भ्रष्टाचार करून श्रीमती पंचफुला तुकाराम टेकाम  ह्या आदिवासी महिलेच्या जागेवर गैर आदिवासी व्यक्ती भिका बुरांडे यांना घरकुल मंजूर केले जेव्हा की आदिवासीचा जमीन हस्तांतरण कायदा आहे अशा परिस्थितीत एखाद्या आदिवासीची जमिनी खरेदी केल्यास ती जमीन मूळ मालक आदिवासी असलेला परत केल्या जाते. त्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सचिव यांनी आदिवासी हस्तांतर कायद्याचा भंग केला आहे. ग्रामपंचायत सचिव आणि गटविकास अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ  करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व  जिल्हाधिकारी यांना संबंधितांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. परंतु कारवाई न झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि ग्राम विकास मंत्री यांच्याकडे बडतर्फीची मागणी करण्यात आली आहे .
विधानसभेत तारांकित प्रश्नासाठी आमदार महोदयांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम यांनी निवेदन देत उपरोक्त मागणी केलेली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या