९ डिसेंबर जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन...
भ्रष्टाचार ही फक्त भारताला( नव्हे तर संपूर्ण जगाला लागलेली कीड आहे. कमी जास्त प्रमाणात सर्वच देशात भ्रष्टाचार पसरलेला आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकशाहीच्या विकासातील भ्रष्टाचार मोठा अडथळा आहे. हे ओळखून संयुक्त राष्ट्र संघनटेने २००५ सालापासून जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti Corruption Day) पाळण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्राने ३१ ऑक्टोबर २००३ साली पहिल्यांदा भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद घेतली. त्याचवेळी ९ डिसेंबर हा भ्रष्टाचार विरोधी दिवस ठरविण्यात आला. मात्र, २००५ सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो. भ्रष्टाचार विरोधी जगजागृती करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. भ्रष्टाचारातून व्यक्तीची प्रमाणिकता, नितीमत्ता, सचोटी, निष्ठा संपल्याचे दिसून येते. स्वार्थासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी अनेक जण पदाचा, खुर्चीचा गैरवापर करतात. त्यामुळे लोकशाही मुल्यांची किंमतही कमी होते. अस्थिर सरकारे, आर्थिकदृष्या मागासपणा, विकासाची संथ गती, गरीबी, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकल्याणकारी योजनांचा खेळखंडोबा होण्यास भ्रष्टाचार कारणीभूत आहे. प्रत्येक वर्षी जगभरात सुमारे १ ट्रिलियन डॉलर लाच म्हणून दिली जाते. तर सुमारे २.६ ट्रिलियन डॉलर भ्रष्टाचारी हडप करतात. ही रक्कम जागतिक जीडीपीच्या ५ टक्के आहे. विकसनशील देशांत विकासासाठी देण्यात येणारा निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. अर्थव्यवस्थेला कमकुवत करणाऱ्या आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या या राक्षसाला संपविण्याचाe सारे मिळून निर्धार करू या.
✍🏻
संदर्भ : इंटरनेट
संकलन:-वरिष्ठ पत्रकार
अशोक वस्तानी


0 टिप्पण्या