Ticker

6/recent/ticker-posts

कारेगाव येथे उस दरवाढीसाठी झालेल्या बच्चु भाऊ कडु यांचे प्रथमच उस आंदोलनाला मोठे यश

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :- धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथे उस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाने घेतली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, साखर आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधी यांच्यासोबत सविस्तर चर्चा पार पडली.

चर्चेमध्ये नांदेड जिल्ह्यातील कारखानदारांनी उसाची पहिली उचल किमान २७०० रुपये देण्यास सहमती दर्शविली—ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

विशेष म्हणजे, मागील २५ वर्षांत प्रथमच नांदेड जिल्ह्यातील कारखानदारांनी अधिकृत पद्धतीने दर जाहीर केला असल्याचे शेतकरी बांधवांनी नमूद केले. आंदोलनाच्या सामूहिक ताकदीमुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या