चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:- राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमात, शिवरायांचा इतिहास समाविष्ट होणार आहे, असे राज्यमंत्री पंकज भोईर यांनी म्हटले आहे. राज्यातील शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित केला जाणार नाही; तर राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमात बदल घडवण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जाणार आहे, असे राज्यमंत्री पंकज भोईर यांनी म्हटले आहे.राज्यातील अभ्यासक्रमात लवकरच शिवाजी महाराज इतिहासावरील 22 पानांचा हा महत्त्वाचा धडा जोडला जाणार आहे, असे राज्यमंत्री पंकज भोईर म्हणाले आहेत.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवरील इतिहास हा लवकर सीबीएसई अभ्यासक्रमात जोडला जाईल. व त्यासंदर्भात संबंधित विभागाला तसे आदेश दिले जाणार आहेत, असे राज्यमंत्री म्हणाले आहेत. राज्यातील विरोधकांच्या आरोपाला आज विधान परिषदेतील विशेष बैठकीत राज्यमंत्री पंकज भोईर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राज्यात शिवाजी महाराजांचे आदर्श प्रशासकीय मॉडेल हेच सरकारच्या कारभाराचा आधार असल्याचे स्पष्ट करत, राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोईर यांनी दिली आहे.
राज्यात शिवाजी महाराज प्रशासकीय मॉडेलवर आधारित शासन हे राज्यात सीबीएसई अभ्यासक्रमात बदल करून शिवाजी महाराजांच्या जीवनातील इतिहास अभ्यासक्रमात मांडणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री भोईर यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यात शिवाजी महाराजांनी उभे केलेले आदर्श मॉडेल आजही सरकार चालवत आहे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित करत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॉडेलवर हे सरकार चालले आहे आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसला आहे,“ असे ठाम मत राज्यमंत्री पंकज भोईर यांनी मांडले आहे.
राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमात होणारे महत्त्वाचे बदल याबाबत सीबीएसई संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमातील माहितीवर बोलताना, मंत्री भोईर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ते म्हणाले, इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा सविस्तर 22 पानांचा धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. सीबीएसईचा अभ्यासक्रम एनएसईआरटी तयार करते.
मात्र, एससीईआरटी पुणे यांच्याकडून एनएसईआरटीला अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे आणि राज्यातील सरकार त्याचा गांभीर्याने पाठपुरावा करत आहे. राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमात लवकरच मराठा साम्राज्याचा उदय हा महत्त्वाचा धडा जोडला जाणार आहे. एनएसईआरटी मध्ये महाराष्ट्रातील सदस्य आहेत, त्यांच्याही निदर्शनास अभ्यासक्रमातील त्रुटी आणून दिल्या जातील. शिवचरित्र इतिहास वाचन शाळांमध्ये नियमित होईल का आणि त्यासाठी काही विशेष उपक्रम राबवता येतील का, या दिशेनेही राज्यातील सरकार विचार करत आहे, असे राज्यमंत्री म्हणाले आहेत.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तबद्ध कारभाराचा पुरावा त्या सीबीएसई अभ्यासक्रमात मांडला जाणार आहे. आमदार तांबे यांनी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला नसल्याचा आणि नाशिकला हायस्पीड रेल्वेने जोडण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यावर राज्यमंत्री भोईर यांनी शिवाजी महाराजांची शिकवण ’राज्य प्रगतीसाठी वापरावे’ हीच राज्य सरकारची प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. तसेच आमदार निवासावरून मनोरा झालेल्या शाब्दिक चकमकीत त्यांनी, “जर आधीच्या सरकारने योग्य बांधकाम केले असते, तर मनोरा आमदार निवासस्थान चांगले राहिले असते,“ असे सांगत राज्यमंत्री यांनी ही विरोधकांच्या पूर्वीच्या कारभारावर बोट दाखवले आहे.
राज्यात शिवाजी महाराज यांच्यावरील युट्यूबवरील आक्षेपार्ह सामग्रीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यावेळी राज्यमंत्री भोईर यांनी संभाजी महाराजांबद्दल युट्यूबवर उपलब्ध असलेल्या आक्षेपार्ह नाटकांच्या गंभीर विषयाची दखल घेतली आहे. “संभाजी महाराजांबद्दल जे आक्षेपार्ह नाटक युट्यूबवर आहेत. त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,“ असे आश्वासन राज्यमंत्री पंकज भोईर यांनी सभागृहात दिले आहे.
राज्यातील संगमनेरचे आमदार सत्यजीत तांबे यांना दिल्ली भेटीचे आमंत्रण दिले आहे. तर सभागृहात चर्चेत बोलताना, राज्यमंत्री पंकज भोईर यांनी विधायक दृष्टिकोन दाखवत आमदार तांबे यांना सोबत काम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आपण शिष्टमंडळ करा, आपण जाऊ. येणाऱया पिढीसाठी आपल्याला एकत्र काम करणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्री म्हणाले आहेत. आणि विशेषतः सत्यजित तांबे यांना उद्देशून राज्यमंत्री म्हणाले आहेत की, येणाऱया काळात तुमची वेळ घेऊन जबरदस्ती दिल्लीला घेऊन जाऊ आणि राज्यातील सीबीएसई अभ्यासक्रमात कसे बदल करता येईल यासाठी प्रयत्न करू.
तसेच, आपण एका घरात राहिलो आहोत, येणाऱया काळातही आपण एका घरात राहू ही खात्री आहे, या त्यांच्या सूचक विधानामुळे सभागृहात वेगळी चर्चा होती. राज्यातील शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या योगदानाला केंद्रीय अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्यासाठी, राज्यातील सरकार कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री पंकज भोईर यांनी म्हटले आहे. राज्यषत आता लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमातही बदल होणार आहे ,व नवीन सीबीएसई अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट केला जाणार आहे ,असे राज्यमंत्री म्हणाले आहेत.


0 टिप्पण्या