Ticker

6/recent/ticker-posts

जीव गेला तरी मी कधीही संविधान बदलू देणार नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संविधान हा राजकारणाचा विषय नाही;विरोधकांनी संविधानावरून आपली राजकीय पोळी भाजू नये ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान जगातील महान संविधान आहे.संविधानामुळे भारत एकजूट आणि अखंड आहे.संविधानाला धोका म्हणजे देशाला धोका.त्यामुळे संविधान कोणी बदलू शकत नाही. संविधानाला हात लावेल त्याचे हात काढल्याशिवाय राहणार नाही.मला द्यावी लागली जरी माझी जान तरी मी कधीही बदलू देणार नाही माझ्या भीमाचे संविधान अशी भावनिक कविता सादर करीत  वेळप्रसंगी आपला जीव गेला तरी चालेल पण मी कधीही संविधान बदलू देणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साकार केलेले 
भारताचे संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधान हा राजकारण करण्याचा विषय नाही.आपल्या महान संविधानावरून कोणी राजकारणा करू नये.संविधान धोक्यात असल्याचे नरेटीव्ह पसरवून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये असा टोला ना. रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांना लगावला.

उल्हासनगर येथे महागायिका निशा भगत आणि संघमित्रा बहुद्देशीय महिला मंडळ यांच्या संयोजनातून संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी संविधान हक्क परिषदेचे अध्यक्ष अनिल अहिरे; रिपाइं चे ज्येष्ठ नेते सुरेश बार्शिंग; अण्णा रोकडे; रिपाइं चे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष नाना बागुल ; शंकर कांबळे; संविधान गौरव सोहळ्याच्या स्वागत अध्यक्षा डॉ संजीवनी कांबळे; ॲड.अश्विनी कांबळे; उषाताई तामगाडगे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्रीलंका ,नेपाळ आणि बांगलादेश या देशांची चांगल्या संविधानावीनना मोठी हानी झाली आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या महान संविधानामुळे भारताला कोणी तोडू शकत नाही.भारताला तोडू पाहणाऱ्याना आम्ही तोडू. संविधान भारतीय संसदीय लोकशाहीचा प्राण आहे.त्यामुळे संविधान कधीही कोणी बदलणार. नाही.राजकारण करण्यासाठी विरोधक संविधान बदलण्याची अफवा पसरवतात.संविधान हा राजकारण करण्याचा विषय नाही.संविधान हा आदराचा, अभिमानाचा विषय आहे.संविधानावरून कोणी राजकारण करू नये असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या