चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-आला हिवाळा तब्येत सांभाळा,असे डाॅक्टरांसह बुर्जूग मंडळीही म्हणतात आणि या हिवाळ्यात पौष्टिक अन्न . पदार्थ,फळे,भाज्या खाण्यांकडे कल असतो.या भाज्यांपैकी सध्या शेवगा नामक भाजीला खुपच व्ह्यॅलू आले असून कांही दिवसापुर्वी ६० ते ८० ₹ किलो असलेला शेवगा आजरोजी चक्क २५० ते ३०० ₹ किलो तर सफरचंद १०० ₹ प्रमाणे हंडरगुळीत विकला जातोय.
हिवाळ्याचा मोसम सुरु होताच शेवगा नामे भाजीला मागणी वाढते. कारण,या दिवसात रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा नैसर्गिक उपाय म्हणुनही शेवग्याची ओळख आहे. तसेच यामध्ये कॅल्शियम,लोह तसेच व्हिटॅमिन सी,पोटॅशियम असे घटक जास्त असतात.म्हणुन शेवग्याला सुपरफूड म्हणुनही जाणकार बोलत असतात.हिवाळ्यात सर्दी,खोकला यासह व्हाॅयलर इन्फेक्शन अनेकात वाढतात.अशा परस्थितीत शेवगा उपयोगी पडतो.यासारख्या कारणा मुळे सध्या शेवग्याला मोठी डिमांड आल्याने याच्या भावाने ञिशतक पुर्ण केले आहे.
हंडरगुळीच्या बाजारात जिल्ह्याच्या विविध भागातून किरकोळ भाजी विकणारे येतात.यंदा पावसाळ्यात सरासरीच्या कैकपट जास्त पाऊस झाला.आणि याचा फटका खरीप पीकांसह भाजीपाल्यांनाही बसला. म्हणुन येथील बाजारात शेवग्यासह अन्य भाज्यांची आवक घटल्याचे व दर वाढल्याचे बघायला मिळते.दरात भरमसाठ वाढ झाल्याने घरोघरी होममिन्टरांचे बजेट कोलमडले आहे.
हंडरगुळीच्या बाजाराती भाज्यांचे प्रति किलोचे दर खालीलप्रमाणे
टोमॅटो-३०,बटाटे-३०,कांदे-१०
वांगी-६०,भेंडी-६०,दोडके-६०,७० तर शेवगा ३०० ₹ तसेच पालेभाज्या कोथिंबीर-१०,मेथी-२०,पालक-२०, शेपू-२०,अंबाडी-१५ ₹ १ पेंडी आहे.
हंडरगुळी परिसरात अनेकजण शेवग्याची लागवड करतात.परंतू या वर्षी पावसाने सगळ्याच फळभाज्या सह पीकांची नासाडी केली.म्हणुन उत्पादन कमी आणि मागणी जास्त. यामुळे एवढी महागमोलाची भाजी विकत घेताना १० वेळा विचार करावा लागतोय.
बालाजी संभाजी माने,ग्राहक..
या वर्षी संततधार पडलेल्या पावसाने शेवगाच्या झाडांची फुलं,पानगळती झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली परिणामी मार्केट मध्ये आवक कमी आणि ठोक मध्ये २२०ते२५० ₹ किलो तर किरकोळ मध्ये ३०० ₹ किलो ! अशी परस्थिती निर्माण झाली आहे.
जावेद शादुलसाब शेख,
शेवगा उत्पादक शेतकरी,हंडरगुळी..
शरीरासाठी उपयुक्त असलेला शेवगा घराघरांसह विविध हाॅटेल,ढाबे तसेच लग्न कार्यातही वापरु लागल्यामुळे आवक कमी,जावक जास्त झाल्याने मार्केट मध्ये शेवगा मिळणे दुरापास्त झाले आहे.आणि मिळालाच तर दर वाढलेले.पुढील काळातही हा शेवगा भाव खाऊ शकतो.
माजीद चौधरी
मालक,चौधरी व्हेजीटेबल,हंडरगुळी.


0 टिप्पण्या