चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-दिनांक 25 जानेवारी 2026 रोज रविवारला टिळक विद्यालय, खंडाळा येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत 'ग्रामस्वच्छता अभियान' अत्यंत उत्साहात राबवले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची आवड निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली. मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शाळेचे मैदान (पटांगण), वर्गखोल्या आणि प्रयोगशाळा परिसरातील कचरा वेचून परिसर चकाचक केला.मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमधील प्लास्टिक पिशव्या, कागदाचे कपटे आणि साचलेला कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला.गावातील मंदिरे, वाचनालय आणि सार्वजनिक विहिरींच्या आसपासची झाडे-झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
"स्वच्छ गाव, सुंदर गाव", "कचरा कुंडीचा वापर करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिक्षक आणि ग्रामस्थांचा सहभाग


0 टिप्पण्या