चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- जिल्हा कारागृह येथे बंदिस्त असलेल्या महिलांसाठी पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन महिला पतंजली योग समिती तर्फे घेण्यात आले. शिबिराचे नियोजन महिला पतंजली जिल्हा प्रभारी डॉ. वैशाली गिरीपुंजे यांनी केले. योग शिबिर रजनी बालपांडे, ज्योती पटले,आशा यांनी घेतले. त्याचप्रमाणे योग शिबिराचे समापन बंदिस्त महिलांना हळदीकुंकू तसेच वाण देऊन करण्यात आले .
त्याचप्रमाणे कारागृहात कार्यरत असलेल्या महिलां कर्मचाऱ्यांना देखील हळदीकुंकू आणि वाण देऊन मकर संक्रांतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन महिला पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी डॉ.वैशाली गिऱ्हेपुंजे यांनी केले. सोबत महिला पतंजली महामंत्री अनिता खेडीकर आणि डॉ.वैदेही गिऱ्हेपुंजे, कृष्णाजी खेडीकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी मुख्य तुरुंग अधीक्षक जगताप सर,सहाय्यक तुरुंग अधीक्षक आडे सर यांनी संपूर्ण सहकार्य केले.


0 टिप्पण्या