Ticker

6/recent/ticker-posts

गादेवाडी येथील उरुस म्हणजे हम साथ साथ है चे प्रतीक

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:-येथून जवळच असलेल्या मौजे.गादेवाडी ता.अमदपुर येथील उरुस म्हणजे हिंदू- मुस्लिमांसह सर्वधर्मीयांचे एकात्मतेचे प्रतीक आहे. अहमदपुर तालुक्यातील मौजे.गादेवाडी या छोट्याशा गावात सर्वधर्मीय एकतेची खुप जुनी असलेली परंपरा आजही कायम असल्याने गावातील बाबांच्या उरुस याञेत सर्वधर्मीय भक्तांचा मोठा मेळाच जमला होता.
हिंदू-मुस्लिमांसह सर्वधर्मीय भक्तांचे श्रध्दास्थान असलेले मौजे,गादेवाडी येथील पीर बाबांचा उरुस म्हणजे हम सब एक है,चे प्रतीक असून उरुसानिमित्य दुरदुरुन हिंदू- मुस्लिम भक्त मंडळी मोठ्या श्रध्देने सहभागी झाले होते. व बाबांच्या चरणी नमस्कार करुन नवस फेडत व बोलत होते.कारण,नवसाला पावत असतात.अशी चर्चा भक्तांत होत होती.दि.९ जानेवारीस बाबांच्या उरुस याञेला प्रारंभ झाला असून दुरदुरुन हजारो भक्तांनी चादर,गलप चढविण्यासाठी,दर्शनासाठी गर्दी केली होती.महिलांचा आवडता सण मकरसंक्रात ५ दिवसांवर असल्याने हिंदू महिलांनी या उरुसात मोठ्या भक्तीभावाने सहभाग घेतला होता.हे विशेष..
या उरुसाच्या निमित्ताने माहेरवाशीन बाई-लेकींसह पंचक्रोशीतील महिला,पुरुष नवस बोलण्यासाठी तसेच बोललेला फेडण्यासाठी येथे दरवर्षी मोठ्यासंख्येनी येत असतात.त्यामुळे या उरुसा दरम्यान गावात भक्तीचे अन् आनंदाचे वातावरण होते.हा दर्गा जाग्रत असून कुठल्या पण कार्यात यश हवे तर या बाबाच्या चरणी आजही हजारो महिला,पुरुष आणि युवक,युवती लीन होतात.व बाबांची मनोभावे पुजा करत आर्शिवाद घेतात व अशांना सफलता प्राप्त होते.अशी द्रढ श्रध्दा,भावना भक्तांच्या मनात आहे.सर्वधर्मीय पुर्व बुजूर्गांनी हम सब एक है.ही तयार केलेली परंपरा आज सुध्दा या गावातील सर्वधर्मा मधील जेष्ठ व युवकांनी कायम ठेवल्यानेच हा उरुस म्हणजे एकात्मतेचे प्रतीक व श्रध्दास्थान बनले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या