Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या शिवाजी शाळेत नैसर्गिक पिकतोय भाजीपालामुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षतेत्तर कर्मचा-यांचा नवोपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हंडरगुळी:-हंडरगुळी येथील शिवाजी मा.व उच्च मा.विद्यालयात माझी शाळा,माझी परसबाग हा नवोपक्रम मु.अ.सय्यद सर तसेच शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळूम सुरु केला असून या परसबागेत कडीपत्ता,शेवग्यासह पालक मेथी,कोथिंबीर,टमाटे,शेपू या सारख्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाज्या घेतात. यामुळे रासायनिक खते व फिवारणी केलेल्या भाज्यां- ऐवजी शरिरासाठी चांगली व नैसर्गिकरित्या पिकवलेली भाजी विद्यार्थ्यांच्या ताटात व पोटात जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या भाज्या एकप्रकारे शक्तीवर्धकच ठरु शकणार यात शंका नाही. तसेच या नवोपक्रमाचे सर्व पालकांतून स्वागत,कौतूक होत आहे.
या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीतून परसबाग तयार झाली आहे.व येथील
विद्यार्थ्यांना निसर्गाचे म्हत्व समजावे,त्यांचे शरीर निरोगी राहावे तसेच कुपोषण कमी व्हावे,यासाठी माझी शाळा, माझी परसबाग हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अशी माहिती मु.अ.सय्यद रफीक यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या