चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : पंचशील शिक्षण प्रसारक समिती द्वारा संचालित प़चशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा ता.वणी येथे नुकताच दिनांक २१ / ०१ / २०२६ बुधवारला सन.१९८६ - ८७ इ. १० वी अ, ब, क, या सर्व माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित अध्यक्षस्थानी पंचशील शिक्षण प्रसारक समितीचे अध्यक्ष दिलीपराव पेचे उद्घघाटक माजी प्राचार्य सुरूशे, प्रमुख अतिथी माजी प्राचार्य आसुटकर, माजी प्राचार्य बेलेकर, माजी शिक्षक उपरे, शिरभाते, मगरे, माजी कर्मचारी रामकृष्ण वाटेकर, श्रावण खोले, वामन तोडसाम, संचालक खंडाळकर, चिकटे, घाटे, शरदराव पेचे, भुमिकाताई मत्ते, प्रभावती खामणकर, चहाणकर ताई, धोटे ताई सौ. कन्हाके ताई होते.
या कार्यक्रमात प्रथमतः प्रत्यक्षात आज आपली शाळा भरली असल्याचे समजून प्रथम माजी शिक्षक व कर्मचारी यांची स्वागताने शाळेत आपली दमदार एन्ट्री केली. यानंतर माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी यांनी आपली एन्ट्री करुन आपल्या वर्गात बसले होते.
या कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी प्राचार्य सुरूशे यांनी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बिरसामुंडा व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर पंचशील शिक्षण प्रसारक समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉ. जगन्नाथराव पेचे या़च्या पुतळ्याला मालार्पन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर माजी शिक्षक माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.
यानंतर कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक माजी विद्यार्थी - विद्यार्थीनीने आपल्या जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी शिक्षण घेत असतांनाच्या आठवणी काही किस्से त्यावेळचे शिक्षण, शिक्षकांचा रुबाब त्याची शिस्त अशा अनेक आठवणी जाग्याकरत आपले मनोगत व्यक्त केले. काही माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी यांनी आपल्या कला गुणांतुन गित भजने गाऊन आपली गुण दाखवू दिले. या आनंद सोहळ्यात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसुन येत होते. या स्नेह मिलन सोळ्यास जवळपास शंभर विद्यार्थी विद्यार्थीनी यांना आपली उपस्थिती दर्शविली होती.
या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता आयोजक नरेश जयस्वाल, बंडु टोंगे, प्रकाश चिकटे, संजय चिडे, मोहण डोंगे, राजेश येसेकर, कु. प्रणाली जुनघरे, प्राचार्य. घनश्याम पाटील पंचशील हायस्कूल तथा कणिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा येथील सर्व आजी माजी कर्मचारी शिक्षक - शिक्षिकावृंद माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी या़नी अथक परिश्रम घेतले.
याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. जुनघरे, प्रास्ताविक प्रचार्य घनश्याम पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार बंडू टोंगे यांनी मानले.


0 टिप्पण्या