प्रशासन जागचे ना हाले,ना डुले...!!
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-नांदेड,परभणी जिल्ह्यातुन अहमदपुर,हाळी,हंडरगुळी मार्गे उदगीरकडे वाळूची वाहतूक करणारे अनेक टिप्पर दिवसा आणि राञीच्या वेळी सुसाट धावत असल्याचे सामान्य जनतेस माञ प्रशासनास दिसत कसे नाही?असा प्रश्न हाळी हंडरगुळीतील जनतेतून उपस्थित केला जात आहे.कांही दिवसापुर्वी उदगीर शहर परिसरात महसूल व पोलीस खात्याने एकञीत येत २८५ ब्रास वाळू आणि वाहने जप्त करुन कारवाई केली होती.म्हणुन मध्यंतरी कांही दिवस अवैध वाळू वाहतूक करणारे तस्कर व टिप्पर थंड होते.माञ,का कुणास ठाऊक पुन्हा एकदा तस्करांसह वाळूचे टिप्पर या रोडवरुन दिवसा आणि राञी,मध्यराञी अति वेगाने धावू लागल्याचे स्पष्ट दिसते.
परभणी,नांदेड जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात अवैधपणे वाळूची तस्करी होत आहे.तरीही याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करत असल्याने वाळू तस्करांचा खेळ राञीच्या अंधारात जास्तच चालतोय.परभणी व नांदेड भागातून उदगीरात येई पर्यंत अनेक ठिकाणी महसूल व R.T.O.चे कार्यालये लागतात. तरीही अवैध वाळू वाहतूक करणारे नंबर नसलेले ८,१० टिप्पर उदगीरात सुखरुप जातातच कसे?या मागचा 'अर्थ' काय?हा संशोधनाचा विषय आहे.आणि याच्या खोलात जायला कोणतेही खाते तयार नसल्यानेच नंबर नसलेले टिप्पर वाळू खचाखच भरुन सुसाटपणे धावत असल्याचे दिसते.
अवैध वाळू तस्करी करणारे तस्करांविरुध्द कडक,कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाच्या वन व महसूल खात्याने नोव्हेंबर महिण्यात १ परिपञक काढून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. माञ,शासनाचा हा आदेश शासनाचेच कांही विभाग (अधिकारी) पायदळी तुडवित असल्याचे वाळूची बिनधास्तपणे होणारी अवैध वाहतूकीकडे बघून म्हटले जाते.मध्यंतरी आयजी i.g.शहाजी उमाप साहेबांनी यांनी नेमलेल्या पथकाच्या धास्तीने टिप्पर धावत नव्हते.माञ मागच्या कांही दिवसापासून वाळू भरुन सुसाट व बिनधास्त धावणारे टिप्पर बघून पथक कार्यरत नाही का?असेल तर मग वाळूची तस्करी होते कशी?तसेच "मंथली" चांगला "महसुल" मिळत असल्याने "महसुल व आरटीओ" खाते अवैध रेती वाहतूकीला "आर्शिवाद" तर देत नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित होतात. म्हणुनच मागच्या कांही दिवसा पासून अवैधपणे वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे धक्कादायक वास्तव (चिञ) या रोडवर दिसते.आणि असे चिञ बघून संबंधित "महसुल व आरटीओ" च्या यंञणेंनी शासनाने नोव्हेंबर मध्ये काढलेल्या आदेशाला {परिपञक} केराची टोपली दाखवली आहे.असे म्हणणे चूक ठरु नये.तेंव्हा मोठ्या हिंम्मतीने वाळू वाहतूक करणा-या टिप्पर व वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे धाडस/हिंम्मत दाखविणार कोण?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.



0 टिप्पण्या