भद्रावतीकरांच्या मुलभूत समस्यांना प्राथमिकता द्यावी... नगरसेवक सुनील नामोजवार
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या मुख्य सब्जी मार्केट जवळील सराफा लाईन येथील देशी दारुचे दुकानामुळे या परिसरातील दुकानदारांना व येणाऱ्या ग्राहकांना तसेच दुकानात येणाऱ्या महिलांना दारू पिणाऱ्या लोकांनपासून होणारा मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे या दारू दुकानाचा ना हरकत परवाना रद्द करून येथील दारू दुकान कासमस्वरूपी हटविण्याची मागणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार यांनी काही महिलांसह एका निवेदनाद्वारे नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी व मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी या़चेकडे केली आहे.
या निवेदनात सब्जी मार्केट जवळ असलेल्या नगर परिषदेचे गाळा क्र. २७ /१ व २७ /२ मध्ये सुरू असलेल्या देशी दारू दुकानाला देण्यात आलेले ना हरकत परवाना रद्द करुन सदर दारू दुकान कायमस्वरुपी हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सब्जी मार्केट परिसरातील चिल्लर व ठोक सब्जी विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या कायमस्वरूपी समस्यांवर तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय भद्रावती शहरातील गवराळा, विंजासन, हणुमान नगर, बंगाली कॅम्प, डोलारा, कुंभारबोडी, आंबेडकर वार्ड,शिवाजी नगर, व सुमठाणा परिसरातील अतिक्रमीत झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबतचा विषय सभेपुढे मांडण्याची मागणी करण्यात आली आहे. जुने पोलीस स्टेशनला लागुन असलेले.
सुलभ शैचालय तातडीने दुरुस्त करून नागरिकांच्या वापरासाठी सरु करण्यात यावे तसेच वडाच्या झाडापासून गंगमवार किराणा दुकानापर्यंत आणि पारेलवार दुध डेअरी ते हणुमान नगर पर्यंत रस्त्याचे काँक्रेटीकरण करून दोन्ही बाजूंनी पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. वरील सर्व विषय मुलभूत असुन ते भद्रावती शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व जिव्हाळ्याचे असल्याने येणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार, काँग्रेसच्या गटनेत्या सरीता सुर, नगरसेवक अनिल पडोळे, उर्मिला साव, उषा जाधव, जयश्री दुर्योधन, कल्पना भुसारी, रंजना गिरडकर, सीमा पवार, व प्रथम गेडाम आदी सदस्य उपस्थित होते.



0 टिप्पण्या