Ticker

6/recent/ticker-posts

माढा शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; सर्व पक्षीय शोकसभा संपन्न


(माझ्यासह माढा मतदारसंघाची खूप मोठी हानी ही कधीच भरून न निघणारी आहे)


चित्रा न्युज प्रतिनिधी

सोलापूर :-राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल माढा शहरात सर्वपक्षाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आमदार अभिजीत पाटील बोलताना म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले... 

दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की दादा आपल्यातच आहेत, त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाही. देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या माढा मतदारसंघाची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी आहे.

यावेळी उपस्थित जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, नगराध्यक्षा मिनल साठे,
राजाभाऊ चवरे, उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे, आनंद आप्पा कानडे, संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, शहाजी अण्णा साठे, दिनेश जगदाळे, ज्योतीताई कुलकर्णी, विद्याताई शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, निलेश पाटील, दीपक आबा देशमुख, सुहास काका पाटील, संतोष दळवी, मधुकर ठोंबरे, ऋषिकेश तांबिले,दादा पारडे, संजय भोगे, शंभू साठे, डॉ.जानराव , आबा साठे, संजय तांबिल, अभिजीत उबाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

शोकसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन, या दु:खातून सावरण्याचे बळ त्यांना लाभो, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या