Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांना " स्त्री भूषण रमाई पुरस्कार 2026 नागपूर ( वाठोडा ) येथे सन्मानित. " त्याग मूर्ती माता रमाई जयंती 128 वा महोत्सव "

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :  स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर द्वारा आयोजित, " त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती128वा महोत्सव 2026 दुपारी 4 वाजता सरोदे नगर वाठोडा पोलीस स्टेशन नागपूर, रमाईच्या लेकींना स्त्री भूषण रमाई पुरस्कार तथा आंबेडकर कार्यकर्त्यांच्या सत्कार, गौरवां ज ली कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष - राजकुमार वंजारी ( स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर ) कार्यक्रमाचे उद्घाटक - महेंद्र मडामे ( संरक्षक करुणाकारी कला पाथरी समिती रायपूर ) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन - भदंत नाग दीपंकर महास्थवीर ( मार्गदर्शक समता सैनिक दल, राष्ट्रीय सचिव भारतीय बुद्ध महासभा ) विशेष अतिथी - विनीती धोत्रे, गौतम मोरे ( अध्यक्ष बहुजन धम्म मिशन मुंबई ), प्रमुख अतिथी- अनिल वासनिक ( ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ता ) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी - कमलेश पाटील वर्धा, सतीश कांबळे  ( माजी नगरसेवक हिंगणघाट ), राजन जीवतोडे, सजय नवादे, राहुल थु ल, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांच्या शाल प्रमाणपत्र पुष्पगुच्छ पुस्तक भेट देऊन" स्त्री भूषण रमाई पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिक संगीता गोंडाने, गायिका क्रांती मिन ल, गायिका लता किरण, गायिका राणी तबसूम, गायिका शारदा जा नी, गायक अनिल वैद्य, संबळ वादक राजेश लांडे, रामदास तागडे, शाहीर अरुण मेश्राम, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती पारसी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप तांदळे यांनी केले मोठ्या संख्येने गायक कलावंत, समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या