चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी:- माता रमाई आंबेडकर यांची 7 फरवरी रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यांचे औचित्य साधून " लोककलावंत शाहीर विकास मंडळ " यांच्यावतीने, निशुल्क समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यात स्वतःच्या जीवनाच्या त्याग करून बाबासाहेबांना ज्ञानाच्या शिखरावर नेणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून " लोककलावंत शाहीर विकास मंडळ यांच्यावतीने निशुल्क समाज प्रबोधनाचा कार्यक्रम परभणी जिल्ह्यात दिनांक- 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी लाभ घेण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक काशिनाथ उभाडे, नामदेव ढेपे, भास्कर कांबळे, गायक सदानंद मोरे अकोला, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे रामटेक, यांनी जास्तीत जास्त कलावंतांनीची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या