जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांडे रमेश ददगाल यांनी केली निवेदनद्वारे मागणी !
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्व.डाॅ.सखाराम गोविंदराव कुचिनकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्वपण लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मोठा हातभार लावला होता. तत्कालिन पंतप्रधान यांनी त्यांना ताम्रपट देवून त्यांचा सन्मान केला.एवढेच नाही तर शहरातील आझाद गार्डन येथील शहीद स्मारकवर त्यांचे नाव प्रथम क्रमांकावर कोरलेले आहेत.शासनानी त्यांना येथील चांदा रैय्यवारी येथील गट क्रमांक सहा मधील काही जागा शहीद स्मारकासाठी उपलब्ध करून दिली होती.परंतू ती जागा कुठलीही संमती न घेता एका व्यक्तीने आपल्या ताब्यात घेतली आहे.ही बाब लक्षात येताच स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक तथा दिवंगत सखाराम कुचिनकर यांची कन्या मायाताई कोसरे व स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्था जानाळाचे सचिव रमेश ददगाल यांनी एक लेखी निवेदन पुराव्यानिशी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे कडे आज सोमवारी सादर केले.उपरोक्त जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून देण्यात यावे अशी मागणी त्या निवेदनातून केली आहे.
त्या ठिकाणी शहीद स्मारक बांधण्याचा मायाताई कोसरे यांचा मानस असल्याचे या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी चंद्रपूर मुक्कामी सांगितले.
याच निवेदनाची एक प्रत नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी आज माजी मंत्री तथा बल्हारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केली आहे.



0 टिप्पण्या