चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :- मोर्शी शहरालगत असलेल्या दुर्गवाडा येथील जि.प. प्राथमिक शाळेमध्ये सहशालेय उपक्रमांतर्गत दि. 9 फेब्रुवारी रोजी गजानन चौधरी (केंद्रप्रमुख) यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे जयभारत देशमुख, राजेंद्र ठाकरे, विलास इंगळे, हरीश अनासाने, अर्चनाताई टेकाळे, संजीवनी राऊत, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या यांच्या भरगच्च उपस्थितीत आनंद मेळावा व रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने होऊन महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी जयभारत देशमुख , गजानन चौधरी, सौ. मंजुळा ठाकरे यांनी कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन केले.
आनंद मेळावा व रांगोळी स्पर्धेमध्ये 1ते 5 मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक पद्धतीने स्टॉल लावून व खाद्यपदार्थांची विक्री करून उपस्थितताची मने जिंकली.
रांगोळी स्पर्धा व खाद्यपदार्थ सजावटी बद्दल विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ. मंजुळा ठाकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. अर्पिता साबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.नीलिमा गुबरे. हर्षाताई कुबडे, सौ. वर्षाताई चिकटे, सौ. करुणाताई सरदार, सौ. पूजाताई इंगळे, सौ. शिल्पा गुबरे, कु. सुहानी शेळके, सौ. रंजनाताई गुबरे यांनी परिश्रम घेतले.



0 टिप्पण्या